धार्मिक

गुरुपौर्णिमा अशी साजरी करावी आणि महत्व …

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्व आहे.तसेच गुरुपौर्णिमा हि आषाढ महिन्यात साजरी केली जाते.याच दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता असं मानलं जात.गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली तर खूप लाभ होतो आणि आपल्याला गुरूंचा अशिर्वाद मिळतो असं म्हटलं जात.

गुरुपौर्णिमा हि ह्या वर्षी ३ जुलै ,२०२३ या दिवशी आली आहे. त्या दिवशी सोमवार आहे. गुरु[पौर्णिमेला बरेच जण व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. तसेच वेद व्यास याना वेदांचे खूप ज्ञान होते. वेड व्यास हे ७ चिरंजीवी पैकी एक मानले जात होते. ते चिरंजीवी असल्यामुळे ते अमर आहेत आणि ते आजही जीवन आहेत असं मानलं जात.वेद व्यास याना धार्मिक ग्रंथात भगवान विष्णूचे स्थान देण्यात आलेले आहे.

गुरुपौर्णिमेचा शुभ कालावधी २ जुलै , रविवारी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी सुरु होते आणि ३ जुलै ,सोमवार , दुपारी ५ वाजून ८ मिनिटाने समाप्त होते. त्याच प्रमाणे गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा ३ जुलै ,सोमवारी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होतो आणि दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होतो.हा अभिजित मुहूर्त आहे. या मुहुर्ता ला गुरूंची पूजा केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.

गुरुपौर्णिमा या दिवसाला खूप महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा – पाठ केल्याने तसेच या दिवशी जर उपवास केला तर आपल्या कुंडलीतील गुरु दोष आणि पितृदोष दूर होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे तुमचे करियर , नोकरी व्यवसाय यातील अडचणी दूर होण्यास मदत होते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर तुमच्या अडचणी दूर करायच्या असतील आणि तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर खालीलप्रमाणे गुरूंची पूजा करावी.

पूजा कशी करावी:-

सकाळी लवकर उठावे आणि आंघोळ करावी. तसेच आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून मग अंघोळ करावी. त्यानंतर स्वच्छ कपडे  घालावेत आणि आई – वडिलांचा आशीर्वाद घ्यावा आणि देवांच्या पुजा करण्यास बसावे. देवांची पूजा करावी. देवाची पूजा करताना देवांना पंचामृताने अभ्यंग स्नान घालावे. तसेच आपल्या गुरूंचे देखील पूजा करावी. तसेच भगवान विष्णु ची देखील पूजा करावी.

पूजा झाल्यावर फुले वाहून ,नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी.देवांची पूजा झाल्यानंतर या काही मंत्रांचा जप करावा “ओम गुरुभ्यो नमः “. त्यानंतर आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यावा .तसेच गुरूंना फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा .आपल्या गुरूंचा नेहमी आदर करावा.

“गुरुब्रम्हा गुरू विष्णु गुरुदेवो महेश्वर : I
गुरु: साक्षात परं ब्रम्हा तस्मै श्री गुरवे नमः II