धार्मिक

१५ जानेवारी २०२३, मकरसंक्रातीची संपूर्ण माहिती,तुमच्या राशीनुसार तुम्ही काय दान करावे?…

मित्रानो काही दिवसातच मकरसंक्रांत हा सण येणार आहे. मकरसंक्रात हा सण पौष महिन्यात येत असतो. या सणाला “संक्रात ” देखील म्हणतात . मकरसंक्रांत हा सण सुवासिनी खूप उत्साहात साजरा करतात. मकरसंक्रांतीच्या सणाला “तीळ आणि गुळ ” याला खूप महत्व आहे. या सणाला सगळेजण एकमेकाला तिळगुळ देतात आणि म्हणतात , “तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला”.सुवासिनी या हळदी कुंकू देखील करतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात.मकरसंक्रांतीला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो.

मकरसंक्रांतीला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो.मकरसंक्रांतीला पतंग देखील उडवण्याची प्रथा आहे. या सणाला रंगीबेरंगी पतंग आपल्याला आकाशात उडताना दिसतात. तसेच या सणाला हळदी-कुंका बरोबरच लहान मुलांचे बोरन्हाण देखील करतात. त्या मुलांना काळ्या कलरचा देणेस आणि हलव्याचे दागिने घालतात. तसेच नवविवाहित जोडप्याना देखील हा संक्रांतीचा सण घातला जातो. म्हणजेच, नववधू  काळी साडी,जावयाला काळा ड्रेस आणि दोघांना हलव्याचे दागिने घातले जातात. अश्याप्रकारे त्यांचा मकरसंक्रांतीचा सण हा साजरा केला जातो.

मकरसंक्रांत या सणाला संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते. त्यामुळे या दिवशी उत्तरायण चालू होते. मकरसंक्रांतीला दान केलेले खूप चांगले मानले जाते.म्हणूनच स्त्रिया ह्या य सणाला वस्तूंचे दान करत असतात.या सणाला सुवासिनी ह्या वाण-ववसा करत असतात.

मित्रानो १४ जानेवारी ला भोगी आहे आणि १५ जानेवारीला संक्रांत आहे. १४ जानेवारी रात्री ८.४४ वाजता सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे.१५ जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी पूजेचा काळ हा सकाळी ७. १७ पासून सायंकाळी ६.२० एवढा हा शुभ काळ आहे. ह्या पुण्यकाळातच सुवासिनी सुगडांची पूजा करतात आणि वान-ववसा करतात.

मित्रानो तुमच्या राशी नुसार तुम्ही कोणते दान करावे, त्याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. मकरसंक्रातील तिळाचे दान करावे ते खूप शुभ मानले जाते.मकर राशीच्या लोकांनी तिळाचे दान करावे .मेष, तुला, सिह आणि मिथुन राशीच्या लोकांनी गरम कपड्यांचे दान करावे. वृश्चिक ,धनु, मीन या राशीच्या लोकांनी तांदुळाचे दान करावे. ऋषभ आणि कन्या राशीच्या लोकांनी कपडे दान करावेत आणि कर्क राशीच्या लोकांनी दूध आणि तुपाचे दान करावे.

संक्राती देवीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे . देवीच्या वस्त्राचा कलर हा पिवळा आहे.वासासाठी जाईंच फुल आहे .मोती हा अलंकार आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. राक्षसी हे नक्षत्र आहे. संक्रांतीच्या काळात काही चुकीची कामे करू नयेत. या काळात दान धर्म करावेत.