धार्मिक

३० मे शनी जयंतीला बांधा पायावर काळा धागा, सर्व संकटे साडेसाती दूर होईल.

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील वैशाख अमावस्याला शनी जयंती साजरी केली जात आहे, काहि उपाय करून शनी देवांना आपल्यावरती प्रसन्न करून घेता येते. ह्यापैकींच एक उपाय म्हणजे पायाला काळा धागा बांधणे. ह्यावेळी शनिजयंती ३० मे सोमवारच्या दिवशी आलेली आहे, ह्यादिवशी शनिदेवाची आराधना करून पायावर काळा धागा बाधंल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्ट्टीपासून तुम्ही दूर राहाल. आणि त्याचबरोबर अप शनीच्या वाईट दृस्तीपासून देखील संरक्षण होईल. हा काळा धागा कसा घालायचा आणि त्याचे फायदे काय आहेतह्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मित्रांनो पायात काळा धागा घालणे हि आजकाल फॅशन चा एक भाग बनला आहे, बॉलीवूड ची सेलेब्रिटी लोक देखील काळा धागा बांधलेली दिसतात. ज्योतिषांच्या मते हा काळा धागा पायात बांधल्याने, आपले सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण करतो. शनिदेव अत्यंत रागीट व क्रोधीत स्वभावाचे आहेत, त्यांनी आपल्यावर काही कारणास्तव वाईट प्रभाव पडू नये म्हणून हा शनिदोष टाळण्यासाठी शनिवारी काळा धागा बांधला जातो. असे म्हण्टले जाते कि शनीच्या प्रकोपामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो, अनावश्य खर्च वाढतो.

हे सर्व टाळण्यासाठी आपण पायात काळा धागा बांधून तुम्ही देखील ह्या सर्वांपासून सुटका करू शकता. राहू आणि केतू ह्यांना बळ देण्यासाठी शनिसोबतच काळा धागा खूप प्रभावी मानला जातो. जर हे दोन ग्रह कमकुवत असतील तर पायावर काळा धागा बांधल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू ह्या दोन्ही ग्रहास छायाग्रह मानण्यात येते. राहू आणि केतू हे आपल्याला तुमच्या कुंडलीतील शत्रू ग्रहाच्या साहाय्याने आपले खूप नुकसान करू शकतात.

अश्या परिस्थितीत काळा धागा घालणे हे खूप शुभ ठरू शकते. आता हा काळा धागा कधी व कश्या पद्दतीने घालायचा. हा काळा धागा शनिवारी धारण करावा, हा काळा धागा हा शनी किंवा भैरव मंदिरातून घेऊन आपण बांधवा. हा धागा बांधल्यानंतर आपण शनिदेवाच्या बीजमंत्राचा जप आपण २१ वेळा करावा हे शुभ मानले जाते. जर तुम्ही पायात काळा धागा बांधला असेल तर तुम्ही तुमच्या गळ्यात लाल किंवा पिवळा धागा घालू नका. ह्या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्यावी.

तुम्ही देखील तुच्या पायात काळा धागा बांधला आहे का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा, तसेच हा लेख तुमच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना नक्की शेयर करा.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.