धार्मिक

६ जानेवारी शुक्रवार शाकंभरी पौर्णिमा घराच्या मेन दरवाजावर शिंपडा असे पाणी घरातील बाधा आजारपण, साडेसाती संपून जाईल

मित्रांनो नववर्षातील पौर्णिमा हि ६ जानेवारी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे मित्रांनो ह्या पोर्णिमेचे महत्व काही कारणांनी आणखी वाढलेले आहे कारण हि तिथी माता लक्ष्मीची सर्वात प्रिय तिथी आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार ह्या पौर्णिमेस शाकंभरी पौर्णिमा असे म्हणले जाते कारण ह्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र समाप्त होत आहेत. अश्या अनेक शुभ संयोगात आलेल्या पौर्णिमा तिथीस आपण छोटे काही उपाय नक्की करा.

मित्रांनो हे उपाय माता लक्ष्मीच्या कृपेने तमाम प्रकारच्या समस्या सोडवतात. आपल्या जीवनात जे काही कष्ट आहेत, संकटे आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती प्रदान करतात. सोबतच काही इच्छा असतील तर त्या इच्छा देखील देवी लक्ष्मीच्या कृपेने नक्की पूर्ण होतात. मित्रांनो हे उपाय कोणते आहेत त्यापूर्वी लक्षात घ्या कि पौर्णिमा तिथीस आपण विशेष पूजा नक्की करा.

कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी हि पृथ्वीतलावर असते. आणि जी व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी मनोभावे पूजा करते माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करते, लक्ष्मी चालीसा चा पाठ करते अश्यांवर माता लक्ष्मी प्रसन्न राहते व त्या व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक तंगी दूर करते.

मित्रांनो शुक्रवारी रात्री आपण कोणत्याही पाच झाडांची पाने तोडावीत आणि एखाद्या पात्रात हि ५ पाने टाकून त्यात थोडे पाणी टाकावे व असे हे पात्र आपण आपल्या घराच्या छतावर किंवा अश्या ठिकाणी ठेवा जेणेकरून चंद्रप्रकाश त्यावर पडेल. पौर्णिमेच्या रात्री आपण हा उपाय करायचा आहे मात्र लक्षात घ्या कि पाने हि आपण सूर्य मावळण्यापूर्वी तोडून ठेवा.

जो उपाय आपण आता सांगतो आहे तो अगदी कोणीही केला तरी चालणार आहे. कारण ह्या उपायाने घरातून आपल्या नाकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि आपल्या घरात आपल्याला नेहमी चैतन्यमय वाटू लागते. दुसऱ्या दिवशी आपण हि पाने आपण त्या पात्रातून काढून आपण ती पाने आपण आपल्या देवघरात ठेवून द्याची आहेत. आणि पाणी जे आहे ते आपण आपल्या संपूर्ण घरात शिंपडायचे आहे घराच्या मुख्य दरवाज्यवर तसेच घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये बाथरूम टॉयलेट मध्ये देखील आपण हे पाणी शिंपडायचे आहे.

मित्रांनो ह्या पाण्यात चंद्रदेवतेची किरणे पडलेली असतात आणि त्यामुळे हे पाणी अतिशय शुद्ध तसेच उर्जावान असते. मित्रांनो हा छोटासा उपाय आपण नक्की करून पहा हा उपाय सर्वानी करण्यासारखा आहे. मित्रांनो आपण ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत आहे आणि ह्या दिवशी आपण पूजा करत असताना हा एक छोटासा उपाय नक्की करून पाहा.

लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात आपण ह्या काही वस्तू ठेवायच्या आहेत. ५ कवड्या, थोडेसे केसर आणि चांदीचा सिक्का हा नसेल तर आपण तांब्याचा सिक्का आपण ठेवायचा आहे. त्यानंतर आपण त्या कपड्याची गाठ बांधायची आहे व त्यानंतर आपण अष्टलक्ष्मीची नावे आपण घ्याची आहेत.

हे सर्व आपण कुठे करायचे आहे तर आपण हे सर्व आपण ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा केली आहे त्या ठिकाणी आपण हा उपाय करणार आहोत त्यानंतर आपण जी कपड्यात वस्तू ठेवून पोटली बनवलेली आहे ती आपण मातेच्या चरणी ठेवून आपण हि अष्टलक्ष्मची नावे आपण घ्याची आहेत. अष्टलक्ष्मी कोणत्या तर, आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी अश्या प्रकारे अष्टलक्ष्मीची नावे घ्या.

त्यानंतर आपण जी हि पोटली आहे ती आपण आपल्या कपाटात जिथे आपण पैसे ठेवतात त्याठिकाणी आपण हि पोटली ठेवायची आहे. मित्रांनो हा उपाय इतका प्रभावी आहे म्हणजे जोपरेंत हि पोटली तुमच्या तिजोरीत असेल टोपरेंत तुमच्याकडे सत्याने तुमच्याकडे येत राहील. धनप्राप्तीचा हा अचूक असा उपाय आहे.