पैसा खुप येतो पण टिकत नाही ,हा फॉर्मुला वापरा आणि बचत करा...
अर्थ

पैसा खुप येतो पण टिकत नाही ,हा फॉर्मुला वापरा आणि बचत करा…

मित्रांनो सध्या गुंतवणुकीचे भरपुर मार्ग आहेत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो कि नेमकी कशात गुंतवणुक करायची? त्याचा किती फायदा होईल आणि त्यात किती परतावा मिळेल. तसेच आपण जी गुंतवणूक करतो ती सुरक्षित आहे का? त्यात आपल्याला तेवढा नफा मिळेल का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

मित्रांनो अनेक लोकांना पगार हा खूप येतो पण त्याची योग्य अशी इन्व्हेस्टमेंट न केल्यामुळे आलेला पैसा हा सगळा खर्च होतो आणि तो पैसा काही टिकत नाही. तर अश्या लोकांना 50-30-20 हा फॉर्मुला वापरून गुंतवणुक केली पाहिजे ,म्हणजे त्यांची गुंतवणूक हि योग्य पद्धतीने होईल आणि त्याच्या पैश्याची बचत होण्यास सुरुवात होईल.

तुम्ही हा गुंतवणुकीचा नियम वापरून तुमच्या पैशांची योग्य अशी बचत हि करू शकता.तुमच्या पैशांची बचत झाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती हि सुधारू शकते. गुंतवणुकीच्या 50-30-20 ह्या फॉर्मुल्याबद्दल ची माहिती हि खालीलप्रमाणे सविस्तररित्या पाहुयात.

पगाराची विभागणी

मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला जेवढा पगार आहे त्याची तीन भागात विभागणी करायची.म्हणजेच 50-30-20 ह्या पद्धतीने विभागणी करायची.एलिझाबेथ वॉरन यांनी या नियमाची सुरुवात केली आहे.एलिझाबेथ यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा पगार हा गरज,इच्छाआणि बचत या पद्धतीने तीन भाग करायचे.

पगार 50% हा गरजांसाठी :-

तुमच्या पगाराचा 50% भाग हा तुमच्या गरजांसाठी वापरायचा आहे. गरज म्हणजे घरातील किराणा सामान,मुलांचे शिक्षण,ईएमआय ,आरोग्य विमा अश्या अनेक खर्चावर हा 50% खर्च करायचा आहे.तसेच लाईट बिल,मोबाईल बिल,रेंट,दूध अश्या देखील खर्च यामध्ये समाविष्ट होतो. तसेच ज्या गोष्टी ह्या खूप गरजेच्या आहेत त्यावर हा खर्च करायचा आहे.

पगाराचा 30% हा इच्छांसाठी :-

मित्रांनो दुसरा नियम हा पगाराचा 30% भाग हा तुमच्या गरजांसाठी आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा ह्या या भागात पूर्ण करू शकता. त्या म्हणजे चित्रपट पाहणे,हॉटेलचं जेवण,फिरायला जाणे,पार्टी,पार्लरला जाणे,कपडे खरेदी अश्या गोष्टी करू शकता. ह्या मध्ये असे खर्च आहेत कि तुमची इच्छा नसेल तर तुम्ही हे खर्च टाळू शकता किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता.

पगाराच्या 20% हा बचतीसाठी :-

मित्रानो तुमच्या पगाराचा 20% भाग हा बचतीसाठी आहे. त्यात तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी पैश्याची गुंतवणूक करू शकता.तुमच्या भविष्याचे नियोजन यात करू शकता.जसं कि तुमच्या मुलांचे शिक्षण,मुलांचे लग्न,तुमच्या निवृत्ती साठी नियोजन या पैश्यांची तुम्ही करू शकता. तुम्ही जर दार महिन्याला पगाराच्या 20% अशी जर बचत केली तर तुमची वारश्याला खूप मोठी बचत होऊ शकते. त्यामुळे या नियमानुसार तुम्ही बचत करायला सुरुवात केली पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला जर 50 हजार रुपये पगार असेल तर त्या पगाराच्या या नियमानुसार कसे नियोजन करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे.(50000=25000+15000+10000)

50-30-20 या नियमानुसार तुम्ही 50 हजारच्या 50% म्हणजेच 25 हजार हि रक्कम तुमच्या गरजांसाठी वापरायची आहे. तसेच पुमच्या पगाराच्या 30% भाग म्हणजेच 15 हजार हा तुमच्या इच्छांची खर्च करायचा आहे. तसेच 20% म्हणजेच 10 हजार हि तुमची बचत नहोणार आहे. तर हि बचत तुम्ही गुंतवणुकीसाठी वापरू शकता. हि रक्कम तुम्ही FD करू शकता किंवा Mutual fund मध्ये invest करू शकता. अशी पद्धत जर वापरली तर तुम्हाला खूप बचत होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.(50000=25000+15000+10000)