धार्मिक

स्वामीसंदेश जो तुमचे जीवन बदलून टाकेल एकट्यात असताना हा लेख अवश्य वाचा

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो जेव्हा सर्व काही संपून गेलंय असं वाटते तीच खरी वेळ असते नवीन काही तरी सुरु करण्याची घडून गेलेल्या गोष्टींकडे अजिबात पाहू नका, पुढे येणाऱ्या गोष्टींकडे विचार करा. स्पर्धेत तोच टिकून राहतो जो स्वतः विचार करतो जो परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बदल घडवतो.

वाहतो झरा आणि थांबते ते डबके, ह्या डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसात असतात तोच खरा माणूस महान बनतो. नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झाल्यास कि संशयाने बगणाऱ्या नजरा आपोआपच झुकतात. काही वादळे विचलित करण्यासाठीच नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. समुद्रातील वादळे हि मनातील वडिलांसमोर काहीच नाहीत. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तेव्हा तुम्ही नाव कामविण्यात व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचे कारण बना. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती वाटते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला अगदी वेडे म्हण्टले तरी चालेल कारण मित्रांनो येडे लोकच इतिहास घडवणारी असतात.

आपल्या मागे कोण काय बोलते ह्याबद्दल आपल्याला काहीच फरक पडायला नको. माझ्या समोर कोण काही बोलते ह्याची हिम्मत नाही आणि त्यातच माझा विजय आहे. कधीही कोणाचाहि भावनांसोबत खेळू नका कारण तुम्ही हा खेळ जिंकाल देखील मात्र समोरच्या व्यक्तीला तुम्ही ह्या खेळात आयुष्यभर हरवून बसाल. चुकीच्या दिशेला धावण्यापेक्षा आपण योग्य त्या दिशेला हळू हळू गेलात तर उत्तम. हरलात तर लाजू नका व जिंकलात तर माजू नका. अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर गाठायचा असतो.

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत राहिली नसते. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्ही फक्त एकदा आरश्यात पाहण्याची गरज आहे. आपल्या मनासारखे कधीच घडत नसते. हीच माझी ओळख आहे हा आपले नशीब आपल्याला सांगत असते.

सुखाला सामोरे जाण्यातच खरे कौशल्य असते. आणि त्यात जमिनीवर राहुन आकाशात उडायचे असते. तुम्ही तुमच्या कंफर्ट झोन च्या कक्षेतून तुम्ही बाहेर पडा . काहीतरी आपण नवीन करून पाहायचे असते तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. स्वतःचा आपण विकास करा. लक्षात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा. अशक्य हा शब्द तुमच्या आयुष्यतून काढून टाका. उठा, जागृत व्हा, जोपरेंत आपले ध्येय सध्य होत नाही टोपरेंत आपण थांबू नका. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण परमेश्वर असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमीच उतकृष्ट कलाकाराला देत असतो.

असामान्य माणसाची तीन लक्षणे लक्षात ठेवा. तो नसल्याने त्यांना चिंता नसते. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो साहसी असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. यश नेहमी प्रयत्नानांना चिकटलेले असते. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. आपले ध्येय विसरू नका.

अन्यथा जे आपल्याला काही मिळाले आहे त्यावर आपल्याला समाधानी राहण्याची सवय आपल्याला लागेल. स्वामी समर्थ बोलतात कि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो हा लेख जास्तीत जास्त शेयर करा. तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहण्यास विसरू नका, धन्यवाद.