लाईफस्टाईल

कौतुकास्पद स्टोरी: सुनबाई निघाल्या कॉलेज ला !

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण खूप स्वागत आहे, मित्रांनो आजचा लेख म्हणजे एक खूप छान अशी बातमी व एक कौतुकस्पद गोष्ट आहे जी आपल्या सासऱ्याने आपल्या सुनेसाठी केली आहे. तर मित्रांनो हि घटना सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या अंकुश मोहिते ह्यांची आहे. ह्यांना एक चिरंजीव आहेत त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रेम विवाह केला.

ह्या बातमीने त्यांना चांगलाच शॉक बसला होता. अंकुश मोहिते ह्यांनी आपल्या पोस्ट मध्ये सांगताना लिहताना सांगतात कि मी माझ्या मुलाचे आयुष्यभर तोंड देखील पाहायचे नाही अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली. पण शेवटी बापाचे काळीज मुलांनी कितीही चुका केल्या तरी त्या पदरात घ्यावाच लागतात त्यामुळे हि भीष्मप्रतिज्ञा फार फार २ महिने टिकली.

एकदा सुनबाईने त्यांना त्यांच्या सासऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील त्यांच्या सुनेचा कॉल घेतला बोलले त्यानंतर त्यांना त्यांच्यातील वडिलांची भावना जागी झाली. त्यांना कळून चुकले कि आपली गृहलक्ष्मी आपल्याला घरी आणायलाच हवी. त्यांच्या मनात हा विचार पक्का होता मात्र एक प्रश्न समोर होताच तो म्हणजे घरात आणल्यानंतर सासू सुनांचे कसे पटणार. कारण त्यांच्या धर्मपत्नी ह्या थोड्या कडक स्वभावाच्या होत्या, व खोटे बोलणे तर त्यांना अजिबात आवडत नसे.

एकेदिवशी त्यांनी त्यांच्या पत्नीशी सर्व मनातले बोलले व त्यांना त्यांच्या सुनेला घरी घेऊन येण्याचा विचार आपल्या बायको समोर मांडला त्यांना. त्यांच्या पत्नीला देखील हा विचार पटला व त्यांनी आपल्या सुनेला घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सुनेला अगदी मानाने घरी आणले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना एक नातं अगदी हसरी व गोड अशी नाव जन्माला अली व त्यावेळी अंकुश आजोबा झाले होते. त्यांची सुनबाई हि त्यांच्या अगदी लहानपणापासून त्यांच्याओळखीची होती.

त्यांना सुनेचे शिक्षण हे १० वि पर्यंत झाले होते काही कारणास्तव तिला पुढील शिक्षण घेता आले नव्हते मात्र त्यांचे चिरंजीव हे केमिकल इंजिनिअर होते. दोघांच्या शिक्षणामधील येवढा फरक पाहून त्यांच्या मनात पुढे जाऊन यांचा संसार अनबॅलन्स होणार हे दिसत होते. असा संसार लवकर बिघडतो असे त्यांना वाटले. त्यांना त्यांच्या सुनबाईचे अस्तित्व नाही तर तिचा स्वाभिमानही जपायला पाहिजे असे वाटले. त्यांनी त्यांच्या पत्नीशी बोलून दिले कारण संसारात संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्यांच्या पत्नीने देखील ह्या सर्वांसाठी होकार दिला. मात्र प्रश्न होता त्यांच्या नातीचा, तिच्या संगोपनाचा.

कारण अंकुश मोहिते हे गवंडीकाम करत होते त्यामुळे त्यासोबत बाळाला सांभाळणे थोडे कठीण होते पण तिने हे आवाहन स्वीकारले व तिच्याकडे देखील बाळ राहू लागले. झाले आता सर्व काही रांकेला लागून आता सुनबाईच्या कॉलेज ला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तिच्या सासऱ्यांनी तळदेवच्या काॅलेजला त्यांच्या सुनबाई ‘अदीती ‘हिचे अकरावी आर्ट चे अॅडमिशन घेतले. अगदी युनिफॉर्म त्यांच्या पत्नीने शिवला .वाईला जाऊन लागणारे शैक्षणिक साहित्य घेऊन आले आणि अश्यात सर्व झाले व सुनबाई काॅलेजला जाऊ लागली.

एवढी सर्व चांगले सुरु असताना अंकुश त्यांना काही दिवसाआधी डॉक्टरांनी त्यांना मधुमेह असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी थोडेसे घाबरल्यासारखे झाले. त्यांनी त्यांच्या सुनेच्या शिक्षण कुठेपर्यँत करायचे हे अगदी ठरवून ठेवले आहे. मात्र त्यांची एकच देवाकडे मागणे आहे कि ते सर्व होईपर्यँत ते जिवंत राहूदेत. तर मित्रांनो अशी होती अंकुश मोहिते ह्यांची एक कहाणी. आजच्या युगात असे सासरे मिळणे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या सुनेसाठी जे केले ते खरोखऱच कौतूकास्पद आहे.