आरोग्य

सफरचंद खाल्यानंतर टाळा हे पाच पदार्थ नाहीतर होतील दुष्परिणाम.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो दररोज एक सफरचंद खावा आणि डॉक्टरांकडे जाण्यापासून वाचा अशी इंग्रजी म्हण आहे आपले शरीर तंदुरुस्त, निरोगी ठेवण्याचे काम हे सफरचंद करत असते मात्र दररोज एक सफरचंद आपण नित्य नियमाने आपण खायला हवे मित्रांनो हा सफरचंदाचा महिमा जरी मोठा असला तरी सुद्धा काही पदार्थ असे आहेत जे सफरचंद खाल्यानंतर लगेचच खाऊ नयेत. चला तर जाणून घेउयात ते पदार्थ कोणते आहेत.

त्यातील पहिला पदार्थ आहे ते म्हणजे पाणी. सफरचंद खाल्यानंतर आपण लगेच पाणी पियू नये कारण असे आहे कि ह्यामुळे आपल्या शरीरातील कफ हा प्रचंड प्रमाणात वाढतो. म्हणून हि गोष्ट आपल्याला टाळायला हवी. मग पाणी कधी प्याचे तर साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर आपण पाणी पिले तरी चालते. मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कोणतीही आंबट वस्तू, सफरचंद खाताना किंवा खाऊन झाल्यानंतर लगेचच ह्या आंबट वस्तू खाणे टाळावे. मग त्यात चिंच, लिंबू इत्यादी आंबट वस्तू आहेत त्या खाऊ नका.

कारण असे केल्याने, गॅसेस ऍसिडिटी होणे असे त्रास वाढतात. तसेच छातीत जळजळ होणे म्हणजेच थोडक्यात पित्ताचा प्रकोप होणे अश्या समस्या होतात. म्हणून हि एक गोष्ट महत्वाची आहे. मित्रांनो पुढील वस्तू फार महत्वाची आहे सफरचंद खाल्यानंतर मुळा अजिबात देखील खाऊ नका. बऱ्याच जणांना ह्याबद्दल शंका असतात कि सफरचंद खाल्यानंतर जर आपण मुळा खाल्ला तर आपल्या त्वचेवर पांढरे डाग निर्माण होतात. आपले सौंदर्य खराब करण्याचे काम हे पांढरे डाग करत असतात. म्हणून आपण सफरचंदाचे सेवन केल्यानंतर लगोलग आपण हे खाऊ नका.

आपण दुसऱ्या दिवशी २४ तासानंतर आपण सफरचंद खाऊ शकता. पुढील पदार्थ आहे तो म्हणजे दही, दह्याची तासीर थंड आहे म्हणून आपण सफरचंद खाल्यानंतर लगेच जर दही खाल्ले तर आपल्या छातीत कफ हा मोठ्या प्रमाणात वाढतो. मित्रांनो बऱ्याच जणांना रात्री उशिरा जेवण करण्याची सवय असते आणि असे उशिरा जेवण केल्यानंतर झोपण्यापूर्वी सफरचंद खातात. तर अशी सवय जर असेल तर ती सोडून द्या कारण रात्रीच्या वेळी जर आपण असे खात असाल तर तुम्हाला श्वसनासंबंधी आजार तुम्हाला जडण्याची शक्यता असते.

विशेषकरून अस्थमा सारखे आजार तुम्हाला होऊ शकतो. आणि ज्यांना अस्थमा अगोदरच असेल तर आपण रात्रीच्या वेळी सफरचंद चे सेवन चुकूनही करू नका. तर मित्रांनो सफरचंद हे अतिशय गुणकारी फळ आहे मात्र ती खाताना थोडीशी काळजी आपण नक्की घ्यावी.