अक्षय्य तृतीया अत्यंत दुर्मिळ योग ! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती...
धार्मिक

अक्षय्य तृतीया अत्यंत दुर्मिळ योग ! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती…

अक्षय्य तृतीया हि अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो.अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.ह्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.अक्षय्य तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथिला साजरा केला जातो.अक्षय्य तृतीया या वर्षी १० मे रोजी आली आहे.हा अगदी शुभ मानला जातो.

अक्षय्य म्हणजे “जे कधीच संपत नाही” म्हणूनच याला अक्षय्य तृतीया असे मानतात. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा सण खूप पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी विष्णुला तांदूळ अर्पण करतात.या दिवशी चिंच आणि आंबे हे देवाला अर्पण करतात. तसेच वर्षभर चांगले पीक यावे ससाठी देवाला प्रार्थना करतात. या दिवशी तूप,साखर ,धान्ये,फळे,भाज्या,सोने ,कपडे अश्या वस्तू दान करतात.

अक्षय्य तृतीया हा खूप शुभ काळ मानला जातो. तसेच या दिवशी लग्न करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी केलेले दान याचे पुण्य हे खूप मोठे असते ,ते पुण्य कधीच संपत नाही. या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणे,उपनयन,उदघाटन ,कोणतीही शुभ कार्ये हि करू शकतात. या दिवशी कोणतेही शुभ काम सुरु केले तर त्याला यश हे मिळते.तसेच खूप प्रगती हि होऊ शकते.

अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात १० मे ला अक्षय्य तृतीया आहे.तसेच अक्षय्य तृतीयेला म्हणजेच १० मे ला पहाटे ४. १५ मिनिटांनी सुरु होणार आहे आणि ११ मे ला दुपारी २.५० मिनिटांनी समाप्त होणार आहे. अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त हा पहाटे ५.३३ मिनिटांपासून दुपारी १२. १८ मिनिटांपर्यंत आहे तसेच या शुभ मुहूतावर तुम्ही सोनं हे खरेदी करू शकता.अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीसाठी हा मुहूर्त खूपच शुभ आहे

मित्रांनो या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला खूप चांगला योग आलेला आहे.हा जो योग्य आहे तो १० मे ला दुपारी १२.०८ मिनिटांनी सुरु होत आहे. तसेच हा शुभ योग ११ मे ला सकाळी १०.०३ मिनिटांनी समाप्त होत आहे.या शुभ आणि सुकर्म योगामध्ये तुम्ही सोनं हे खरेदी करू शकता. तसेच या दिवशी दिवसभर हा रवियोग आहे.

मित्रांनो रवियोग आणि सुकर्म योग्य हा या दिवशी एकत्र आल्यामुळे हा योग खूपच शुभ मानला जातो. तसेच अक्षय्य तृतीयेला रोहिणी नक्षत्र आणि मृगशिरा नक्षत्र या दोन नक्षत्राचा हि योगायोग आहे. याचप्रमाणे या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला खूपच चागले योग आलेले आहेत.

मित्रांनो त्यामुळे शुभ काम आणि शुभ कार्यासाठी खूप छान असा योग येत आहे.अश्याप्रमाणे अक्षय्य तृतीयेला खूप छान असा दुर्मिळ योग्य आला असल्यामुळे सगळ्यांना या चा लाभ हा होणार आहे . तसेच या दुर्मिळ योगामुळे सगळ्यांना दुप्पट फळ हे मिळणार आहे.