धार्मिक

सर्व वाद होतील दूर व सर्व इच्छा होतील पूर्ण फक्त एक तेजपत्ता पण जाळा असे.

नमस्कार मित्रांनो आपल्या प्रेत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते आणि हि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण परिश्रम देखील करतो हि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे विश्व आहे हे मदत करू शकते ते कसे ? हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात. आपल्या प्रेत्येकच्या घरात किचनमध्ये तमालपत्र नक्की असते त्यालाच तेजपत्ता असे देखील म्हणतात तर ह्या तेजपत्ता ह्याच्या मदतीने आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतो. ह्या तेजपत्त्याचे तंत्र शास्त्रात खूप मोठे महत्व सांगितले आहे.

हा तेजपत्ता मनुष्यच्या मनातील इच्छांची पूर्तता करू शकतो म्हणून हा तेजपत्ता आपण आजच्या उपायासाठी घ्याचा आहे, असा तेजपत्ता घ्या कि जो कुठेही फाटलेला नसावा किंवा त्याला कीड लागलेली नसावी. असा हा तेजपत्ता घेऊन आपण ह्या तेजपत्ता वर लाल शाईच्या पेनाने किंवा स्केचपेन ने आपण ह्या पानावर आपली इच्छा थोडक्यात लिहायची आहे. उदाहरणार्थ जर तुमची आर्थिक अडचण असेल तर मला पैस्याची गरज आहे असे लिहावे. फक्त धन किंवा पैसा असे एका शब्दात लिहले तरी आणखी चांगले. जर आजारी पडला असेल आरोग्यविषयक काही तक्रार असेल तर तुम्ही ह्यावर लिहायचं आहे आरोग्य असे लिहावे.

तुमच्यकडे जर पैसा आहे परंतु सुख नसेल तर फक्त लिहा सुख, अश्या प्रकारे आपण आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा अगदी एका शब्दात लिहण्याचा प्रयत्न करा. आपली इच्छा आपण ह्या तेजपत्यावर लिहल्यानांतर आपण तो तेज पत्ता आपल्या उजव्या हातात घ्याचा आहे व तो आपल्या तळहातावर ठेवायचा आहे व त्यानंतर आपण आपला डावा हाथ हा त्या पानावर ठेवून द्याचा आहे. आणि नंतर आपण हाथ जोडून देवाला प्रार्थना करायची आहे कि हे देवा माझी हि जी इच्छा जी काही लिहली आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर आपण एक दिवा पेटवायचा आहे व त्या दिव्यावर आपण हा तेजपत्ता धरून आपण तो जाळायचा आहे.

लक्षात घ्या मित्रांनो हा तेजपत्ता जळत असताना जी काही त्याची राख पडेल ति आपण एका डिश मध्ये एकत्रित करायची आहे. अशी हि राख आपण घराच्या बाहेर जाऊन किंवा अगदी तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा बाल्कनी मध्ये देखील तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन आपण हि जी राख आहे त्या राखेवर एक फुंकर मारायची आहे, त्यानंतर अश्या पद्दतीने आपण सर्व राख हवेत अशी फुंकर मारून उडवायची आहे. संपूर्ण विश्वात ह्या राखेमार्फत तुमचा संदेश पोहचतो आणि संपूर्ण ब्रह्मांडातील देवदूत असतील ते तुमची इच्छा पूर्ण करू लागतील. तुमचे घराचे स्वप्न असेल तर फक्त घर असे देखील लिहू शकता.

सोबतच आपल्या घरात अश्या काही वस्तू असतात कि ज्यामुळे आपली प्रगती होत नाही, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या आपलयाला घरातील ह्या नाकारात्मक शक्तींमुळे मिळत नाहीत. अश्या वेळी हि नकारात्मक शक्ती घरातून बाहेर काढणे फार महत्वाचे असते अश्यावेळी आपण तेजपत्ताचा वापर आपण करू शकतो, ह्यासाठी आपण हि नकारात्मक शकतो नष्ट करण्यासाठी आपण जो पहिला उपाय सांगितला तो उपाय आपण करायचा आहे. जेव्हा सूर्य मावळू लागेल त्याचवेळी हा उपाय करायचा आहे.

दुसरा उपाय आपण नकारात्मक शक्ती घरातून बाहेर काढण्यासाठी करत आहोत तो देखील आपण सूर्य मावळल्यानंतरच करायचा आहे ह्यसाठी आपण तीन तेजपत्ते घ्याचे आहेत, आणि त्यावर आपण कापराच्या वड्या ठेवून आपण हे तेजपत्ते जाळायचे आहेत. त्यातून जो धूर बाहेर पडेल तो धूर संपूर्ण घरात, घरातील प्रेत्येक कोपऱ्यात फिरवायचा आहे. अगदी टॉयलेट बाथरूम मध्ये देखील आपण हा धूर फिरवायचा आहे. हि पाने जाळल्यानंतर त्यातून जो सुगंध बाहेर पडतो त्यामुळे तुमचे मन प्रफ्फुलीत होईल. मन तेजस्वी बनेल. आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने दूर होते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.