आरोग्य

एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे…

मित्रांनो,आता उन्हाळा चालू झाला आहे.त्यामुळे सगळ्यांनाच काही तरी थंडगार पिण्याची इच्छा हि होत असते.उन्हाळ्यामध्ये आपले शरीर हे डिहाइड्रेड होत असते त्यामुळे पाणी,नारळ पाणी लिंबू सरबत,कोकम सरबत आणि उसाचा रस सगळ्यांनाच प्यायला आवडत असतो.तसेच ह्या प्रकारची सगळी सरबत हे आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात.

उसाचा रस हा आपल्या शरीराला थंडावा देत असतो आणि आपल्याला ताजेतवाने बनवतो. उसाचा प्यायल्यावर आपल्याला एनर्जी निर्माण होते.उसाचा रस हा नियमित प्यावा ,कारण उसाच्या रसामध्ये मॅग्नेशियम,लोह,पोट्याशियम,फॉस्फरस,कॅल्शियम अश्या प्रकारचे पोषक घटक असतात.

उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते.तसेच उसाच्या रसात कॅल्शियम हे अधिक असल्यामुळे आपली हाडे हि मजबूत होतात.उसाच्या रसात ग्लुकोज असल्यामुळे उसाचा रस प्यायल्यामुळे आपल्याला लगेच ताजेतवाने वाटते.तसेच खूप परिश्रम केल्यावर किंवा खूप थकल्यावर एक ग्लास उसाचा रस पिल्यामुळे लगेच एनर्जी येते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते.

उन्हाळ्यामुळे जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा तुम्हाला जर उन्हाळी लागली असेल तर तुम्ही उसाचा रस पिल्यामुळे तुम्हाला हा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.तसेच उसाचा रस पिताना त्यात चिमूटभर मीठ घालून प्यावा म्हणजे तो बाधत नाही आणि आपल्या घशाला खवखव देखील होणार नाही.

मित्रानो तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही उसाचा रस प्यायला नाही तरी चालतो कारण उसाच्या रसात ग्लुकोज चे प्रमाण हे अधिक असते.त्यामुळे शुगर असणाऱ्यांनी स्वतःची काळजी हि घेतली पाहिजे.लहान मुलांसाठी उसाचा रस हा खूप गुणकारी असतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.