मेंथी दाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.मेथी दाण्याचे वापर हा औषध म्हणून केला जातो.मेथी दाण्याचे आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे आहेत ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.
मेथी दाण्यामध्ये कॅल्शियम,फायबर,व्हिट्यामिन सी ,लोह , मॅग्नेशियम आणि सोडियम सारखे पोषक घटक असतात. मेथी दाण्याचे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयोगी असतात. मेथी मुले आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
मेथी दाणे खाल्याने आपली पचनशक्ती सुधारते. तसेच पोटात गॅस ,पोट फुगणे,जळजळ अश्या प्रकारचे आजार देखील कमी होण्यास मदत होते. मेथी हि आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असते.
मेथी दाणे हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. मेथी दाण्यामुळे महिलांना पिरियड्समध्ये जास्त वेदना होत असतील तर त्या कमी होण्यास मदत होते.गर्भवती महिलेसाठी दूध जर कमी असेल तर मेथी दाणे हे फार गुणकारी असतात . मेथी दाण्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मेथी दाणे खूप फायदेशीर असतात.
मित्रांनो रिकाम्यापोटी मेथी दाणे भिजवून त्याचे पनू पिल्यास कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात.
१)मेथी दाणे हे रात्री भजवून त्याचे गाळून ते पाणी आपण सकाळी रिकाम्यापोटी पिल्यास आपले वजन कमी होण्यास मदत होते.
२)मेथी दाणे भिजवलेलं पाणी रिकाम्यापोटी पिल्यास बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते आणि आपली पचनशक्ती सुधारते.
३)मेथी दाण्याचं पाणी रिकाम्यापोटी पिल्यास आपल्या शरीरातील कोलेष्ट्रॉल ची पातळी नियंत्रणात राहते.
४)मेथी दाणे भिजवलेलं पाणी रिकाम्यापोटी पिल्यास सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.
५)मेथी दाण्याचं पाणी रिकाम्यापोटी पिल्यामुळे किडनी संबंधीत आजार कमी होण्यास मदत मिळते.
६)मेथी दाण्याचे पाणी रिकाम्यापोटी पिल्यास आपले हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.
७)मेथी दाण्याचे पाणी पिल्यास स्किनची ऍलर्जी कमी होण्यास मदत होते,तसेच आपलय त्वचेवरचे फोड कमी होण्यास मदत होते.
८)मेथी दाण्यामुळे आपले केस मजबूत होतात आणि केस गळती देखील कमी होण्यास मदत होते.