मखाने खाण्याचे आश्चर्यकारक फायदे...
आरोग्य

मखाने खाण्याचे आश्चर्यकारक फायदे…

मित्रानो कमळासारखी दिसणारी वनस्पतीच्या  ज्या बिया असतात त्यांना “मखाना “असं म्हणतात.कमळाच्या बिया त्या भाजून त्यात पॉपकॉर्न सारख्या पांढऱ्या रंगाची लाही असती त्याला मखाना असे म्हणतात. आज काळ सगळेच आहारतज्ञ हे या मखान्याचे खूप कौतुक करत असतात. याचा डाएट साठी वापर केला जातो.

मखाना म्हणजे काय ?
आपल्या भारतात गहू , ज्वारी , बाजरी, तांदूळ या सगळ्याची आपण कशी शेती करतो तास बिहार जम्मू-काश्मीर ,हिमाचल प्रदेश मिझोराम या राज्यामध्ये मखाना ची शेती केली जाते. माखना हि एक जलपर्णी आहे. कमळासारख्या दिसणारी वनस्पती आहे जी पाण्यावर तरंगते . या वनस्पती बी असते ते म्हणजे मखाना होय.

मित्रानो बरेच लोक मखाना ला कमळाचे बी असते असं म्हणतात, तर असं नाही मखानाच झाड कमला सारखं आहे पण ते कमळाचे बी नाही. माखना ला मराठी मध्ये मखने असे सुद्धा म्हणतात.मखाने हे वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकतो. आपण मखान्याची खीर करून खाऊ शकतो किंवा मखाने भाजून देखील छान लागतात.

मित्रानो आता आपण मखानाचे फायदे जाणून घेऊयात..

१) मेंदूच्या विकासासाठी :-

मखाने हे खूप पौष्टिक असतात. तसेच मखाने आपल्या शरीराच्या आणि मेंदूच्या विकासासाठी खूप पौष्टिक असतात. मुखाने हे नियमित खाल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते, तसेच मखाना हा मेंदूच्या आजारावर अतिशय गुणकारी असतो. माखना हे नियमित खाल्याने मेंदूचे आजार लवकर कमी होण्यास मदत मिळते.

२) संधिवात वर गुणकारी-:

संधिवात संत्र्यानी मखाना खाल्यास त्यांना दुखण्या पासून आराम मिळतो. सांध्याला येणारी सूज, वाताचे झटके येणे,यासारख्या अनेक समस्यांवर मखाना हा गुणकारी ठरतो. रोजच्या रोज ३-४ मखाने हे चांगल्या गाईच्या तुपावर खमंग भाजून नियमित खाल्याने सांधेदुखी आणि संधिवात च्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

३) किडनीचे विकार :-

मित्रांनो ज्यांना किडनी संबंधीचे आजार आहेत त्यांनी मखाने हे नियमित खाल्ले पाहिजे.मखान्याचे नियमित सेवन केल्यामुळे किडनीची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते, तसेच त्यांना आराम देखील मिळू लागतो आणि किडनीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

४) वजन कमी करण्यासाठी:-

मखान्यामध्ये झिरो कॅलरी असतात त्यामुळे वेट लॉस साठी मखाना हा खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे नियमित मखाने खाल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मखाना हा नियमित खाल्ले पाहिजे.

५) गर्भवतीसाठी लाभदायक:-

मखाना हा गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर असतात. मखाना खाल्याने गरोदरपणात महिलांना येणारा थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत मिळते. तसेच गर्भाशयाचे आकुंचन आणि प्रसारण होण्यास मदत मिळते.