ashadhi-ekadashi-sampurn-mahiti
धार्मिक

आषाढी एकादशी संपूर्ण माहिती आणि महत्व …

आषाढी एकादशी हे ऐकलं कि सगळ्यांना पंढरपुरचे विठ्ठल -रुक्मिणी आठवतात. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात हि एकादशी येते. या वर्षी २९ जुन ला आषाढी एकादशी आली आहे. या वर्षी अधिक महिना आला आहे त्यामुळे दोन एकादशी आल्या आहेत. या एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक एकादशी ला चातुर्मास संपत असतो.

आषाढी एकादशी संपूर्ण माहिती

आषाढी एकादशी ला लाखो वारकरी हे आळंदी ते पंढरपूर असे पायी वारी करत येतात.संत ज्ञानेश्वर ,तुकाराम अश्या अनेक संतांच्या पालख्या ह्या पंढरपूर ला येतात. हे वारकरी पायी वारी करतात आणि तहान भूक विसरून ते विठ्ठलाच्या भेटीला येतात.

महाराष्ट्रात आषाढी एकादशीला खूप महत्व आहे.आपलं एक वर्ष हि देवांची एक रात्र असते. तसेच दक्षिणायन हि देवांची रात्र असते आणि उत्तरायण हि देवांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते म्हणूनच या एकादशीला आषाढी देवशयनी एकादशी म्हणतात.

आषाढी एकदशी हि गुरुवारी ,२९ जुन २०२३ ला पहाटे ३ वाजून १८ मिनिटाने सुरु होत आहे आणि मध्यरात्री २ वाजून ४१ मिनिटांनी संपणार आहे. वर्षभर येणाऱ्या सगळ्या एकादशीला विष्णूची पूजा केली जाते. आषाढी एकादशी ला खूप महत्व आहे.

भगवान विष्णु हे चार महिने योगनिद्रेत जातात. त्यामुळे एकादशीला उपवास आणि व्रत केलं जात. या एकादशीला भगवान विष्णू प्रसन्न व्हावेत म्हणून त्याची आराधना आणि उपवास केला जातो.

आषाढी एकादशीला विष्णूची पूजा केली जाते.भगवान विष्णूचा पंचामृताने अभिषेक करून त्याची स्थापना चौरंगावर केली जाते आणि त्यांची फुल,गंध,तुळशीची पाने वाहून मनोभावे पूजा केली जाते. त्या नंतर नैवेद्य दाखून धूप आणि दीप लावून आरती केली जाते. आरती झाल्यावर प्रसाद वाटलं जातो तसेच विष्णुसहस्त्रनाम वाचले जाते आणि योग्य असे दान धर्म केला जातो.

आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुख दर्शन घेता येते.एकादशीला सगळ्या दिंड्या आणि पालख्या ह्या पंढरपुरात दाखल होतात .वारकर्ती हा लांबचा प्रवास करून पंढरपूरला दर्शना साठी येतात.सगळ्या वारकर्यांना त्याच्या भक्तीचा लाभ मिळावा हीच आशा असते.