धार्मिक

१० जुलै रविवारआषाढी एकादशी, ह्या दिवशी चुकूनही करू नका ह्या गोष्टी.

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराष्ट्रात सर्वत्र एकच नाव आहे ते म्हणजे विठुरायाचे. १० जुलै रविवार ह्या दिवशी सर्व वारकरी एकत्र पंढरपुरात सर्व पालख्यांसह दाखल होतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात ह्या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. ह्या दिवशी भक्तजन उपवास करतात, नामस्मरण करतात. पण हे सर्व करत असताना आपण काही अश्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपण ह्या दिवशी केल्या नाही पाहिजेत. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो, कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रांनो मान्यतेनुसार एकादशीची अशी एक कथा आहे कि एकेकाळी मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता त्याने भगवान शंकरांना आपल्या भक्तीने पूजेने प्रसन्न करून घेतले होते. व शिव महादेवांनी त्याला एक वरदान दिले होते कि त्याला कोणत्याही देवाकडून मृत्यू येणार नाही. परंतु एका स्त्रीच्या हस्ते तुझा मृत्यू होईल. ह्या वरदानाने तो देवांवर अन्याय करू लागला. आक्रमण करू लागला, अश्या प्रसंगी सर्व देव हे शिवशंकरांकडे गेले, पंरतु स्वतः त्यांनी वरदान दिल्यामुळे तेही देवांना मदत करण्यास असफल होते.

त्यानंतर सगळे देव स्वतः शिवशंकर देखील एका गुफेत जाऊन लपले तिथे ते देवांच्या श्वसातून एक देवी प्रकट झाली ह्या देवीचे नाव होते एकादशी, तिने सर्व देवांचा वध करून सर्व देवांची सुटका केली. त्या दिवशी पाऊस पडला व देवांना स्नान हि घडले व त्यादिवशी देव गुहेत लपून बसल्याने देवांचा उपवास हि घडला त्यामुळे त्या दिवसापासून एकादशीला उपवास करण्याची प्रथा सुरु झाली असे मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी भगवान हरी विष्णूंची पूजा केली जाते. ह्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते, परंतु ह्या एकादशीच्या दिवशी काही गोष्टी आपण करणे वर्ज करावे. त्यातीलच पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ह्या दिवशी भात खाऊ नका. तुम्ही जरी उपवास करणार नसला तरी देखील ह्या दिवशी तुम्ही भात खाऊ नये. कारण असे केल्याने विष्णूंचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही तसेच पाप त्याच्या हातून घडते असे मानले जाते.

ह्या दिवशी आपण मिठाचे सेवन करू नये, शास्त्रानुसार ह्या दिवशी मिठाचे सेवन करू नये आनी केले तरी अगदी कमी प्रमाणात करावे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या दिवशी आपण मांसाहार करू नये. एकादशीला सर्वात पवित्र व्रत मानले जाते म्हणून ह्या दिवशीय आपण चुकूनही मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी आपण काही भाज्यांचे सेवन करू नये जसे कि वांगे, मुळा, मसूर डाळ, कांदा, लसूण ह्या सर्व वस्तू आपण खाणे टाळावे.

जर ह्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्हाला ह्या दिवशी ह्या वस्तू खाण्याचा संबंध येतच नाही मात्र कोणी उपवास करणार नसेल तर त्याने मात्र ह्या गोष्टींचे पालन मात्र अवश्य करावे. त्याचबरोबर ह्या दिवशी आपण पान हि खाऊ नये, सर्वात महत्वाचे ह्या दिवशीय आपण मद्यपान, जुगार खेळू नये. खोटे बोलू नये. इतरांच्या भावना दुखावल्या जातील असे काहीही बोलू नये. सात्विक व फलाहार घ्यावा व ईश्वराचे नामःस्मरण करावे. तर मित्रांनो तुम्ही देखील एकादशीचे व्रत करणार असाल तर ह्या सर्व गोष्टींचे पालन अवश्य करा.

तसेच लेख आवडला असेल तर कॉमेंट मध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. व लेखाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेयर देखील करा.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.