आरोग्य

शेवग्याच्या पानाचे आयुर्वेदिक फायदे..

मित्रांनो शेवग्याच्या शेंगा ची भाजी आपण नेहमी करतो.शेवग्याच्या शेंगा ह्या पौष्टिक असतात, तसेच शेवग्याची पानाचे हि आपल्या शऱीराला खूप फायदे होतात. शेवग्यामध्ये जीवनसत्वे जास्त प्रमाणात असतात. शेंग्यांच्या शेंगा बरोबरच पाने , फुले ,मूळ ,बिया या सगळ्यांचा आयुर्वेदात औषध होतो. शेवग्यामध्ये कॅल्शिअम खूप जास्त प्रमाणात असते. दुधात जेवढे कॅल्शिअम असते त्यापेक्षा चार पट कॅल्शिअम आणि पोषकमूल्य जास्त प्रमाणात असतात. शेवग्यामध्ये व्हिट्यामिन सी कॅल्शिअम आयर्न , मॅग्नेशिअम , बी कॉम्प्लॅक्स , प्रोटीन कार्बोहायड्रेड हे जास्त प्रमाणात असतात.शेवगा हा सगळ्या आजारावर पण गुणकारी आहे.

मित्रानो आता आपण शेवग्याच्या पानाचे आयुर्वेदिक फायदे बघणार आहोत:-

१)पचनक्रिया सुधारते:- शेवग्याच्या पानांची भाजी खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.शेवग्याच्या पानाची भाजी खाल्याने पचनक्रियाचे आजार नष्ट होतात. तसेच कावीळ झाली असल्यास शेवग्याच्या कोवळ्या पानाचा ताजा रस , एक चमचा मध आणि नारळाचं पाणी एकत्र करून पिल्यास खूप फायदा होतो. शेवग्याची भाजी खाल्यास बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते.तुम्हाला जर भूक वाढवायची असेल तर शेवग्याच्या पानाची भाजी खाली तर भूक वाढण्यास मदत होते.तसेच ज्यांना गॅसेस चा त्रास होतो त्याचा गॅसेसचा चा त्रास देखील कमी होतो.

२)डोकेदूखी कमी होते:-शेवग्याच्या पानांच्या रसात थोडी मिरेपूड एकत्र करून डोक्याला लावल्यास डोकेदुखी लवकर कमी होण्यास मदत होते.तसेच तुम्हाला जर ताप सारखं सारखं येत असेल तर तो हि कमी होतो.

३)तोंड येणे:-ज्या लोकांना नेहमी तोंड येते त्यांनी हि भाजी आठवड्यातून एकदा नक्की खाली पाहिजे असे केल्यास तोड येन कमी होऊन जाईल आणि जर तुम्हाला घशाला सूज असेल तेही कमी होऊन जाईल तर मित्रानो तुम्ही शेवग्याच्या पानाची भाजी हि नक्की खायला पाहिजे.

४)वात कमी होणे:-मित्रानो तुम्हाला जर वाताचा विकार असेल तर तुम्ही शेवग्याच्या पानाची भाजी हि नियमित खाल्ली पाहिजे.शेवग्याच्या पानाची भाजी खाल्यास वाट कमी होण्यास मदत होते. तसेच तुम्हाला जर पोटात किंवा स्नायूंमध्ये गोळा येत असेल तर तो हि कमी होण्यास मदत होते, तर तुम्ही त्यासाठी शेवग्याच्या पानाच्या रसामध्ये खडीसाखर मिक्स करून घेतली तर फायदा होईल.वाता वर शेवगा हा एक प्रकारे चांगलं औषधच आहे असं म्हणतात.

६)काजल:-शेवग्याच्या पानाच्या रसात थोडासा मध मिक्स करून अंजन केल्यास डोळ्याचे आजार कमी होण्यास मदत होते. आपल्या डोळ्यांसाठी शेवग्याच्या पानाची भाजी खाल्यास खूप फायदा होण्यास मदत होते. शेवग्याच्या पानाची भाजी खाल्यास आपली हाडे पण मजबूत होण्यास मदत होते.

७)डायबिटीस नियंत्रणात राहते:-शेवग्याची भाजी ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी हि खाली पाहिजे त्याच्या साठी खूप चांगली असते. त्याची शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. शेवग्याच्या पानामध्ये ग्लुकोसाईस हे जंतुनाशक गुणधर्म आहे.

८)कोपोषण :- मित्रानो कुपोषण कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानाचा वापर केला जातो. शेवग्याची पाने वाळूबन त्याची पावडर बनवली जाते आणि हि शेवग्यच्या पानाची पावडर ज्या मुल कुपोषित आहेत त्या मुलांना हि पावडर दिली जाते. संपूर्ण जगात या शेवग्याच्या पानाच्या पावडरीचा वापर कुपोषण कमी करण्यासाठी केला जातो.

९)केसातील कोंडा :-मित्रांनो तुमच्या केसात जर कोंडा असेल तर तुम्ही शेवग्याच्या पानाचा रस हा घेऊन तो रस केसांना मालिश करत लावला तर केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

१०)उच्च रक्तदाब नियंत्रण:-शेवग्याच्या पानाची भाजी हि ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी हि शेवग्याच्या पानाची भाजी खाल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे शेवग्याची भाजी हि आठवड्यातून एकदा तर खाल्यास फायदा होईल.

मित्रानो तर हे होते शेवग्याच्या पानाची भाजी खाण्याचे फायदे ,त्यामुळे आपण शेवग्याच्या पानाची भाजी हि खाल्यास आपल्याला फायदा होतो. तसेच शेवग्याच्या पानाची भाजी खाल्यास वजन पण नियंत्रणात राहते , हाडे मजबूत होतात आणि जठराचा कर्करोग टाळण्यास मदत होते. त्यामुळे शेवग्याच्या पानाची भाजीचा वापर आपल्या आहारात केला पाहिजे.