सतत आनंदी राहण्यासाठी या पाच गोष्टी नक्की वाचा.
लाईफस्टाईल

सतत आनंदी राहण्यासाठी या पाच गोष्टी नक्की वाचा.

काही व्यक्तीची काम करण्याची पद्धत हि वेगळी असते. बऱ्याच व्यक्तीना आपल्या कामातून थोडा सुद्धा वेळ मिळत नसतो. त्या लोकांचा कामाचा व्याप इतका असतो कि त्यांना आपल्या घरातील लोकांना थोडा सुद्धा वेळ देण्यसाठी नसतो. तर काहींना आपल्या दैनंदिन कामाचे नियोजन कसे करायचे याबद्दल थोडी सुद्धा क्षमता नसते. त्यामुळे त्याना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना समोरे जावे लागते.

आज आपण अशा गोष्टी पहाणार आहोत ज्यांचा सुरवातीला आपण सर्वात जास्त विरोध केलेला आहे. किंवा अशा गोष्टी आहेत ज्या सुरवातीला आपल्यला बिलकुल आवडत नसतात पण काही दिवसा नंतर त्या गोष्टीचा लाभ असंख्य प्रकारे आपल्या समोर येत रहातात. आपल्या जीवनात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला सुरुवातील आवडत नसतात. पण त्याचे असंख्य फायदे हे आपल्या कालांतराने दिसून येतात.

आज आपण अशी गोष्टी पहाणार आहोत ज्यामुळे आपण सतत आनंदी राहण्यसाठी नक्कीच मदत होईल. कारण आपल्या आजूबाजूल अशा असंख्य गोष्टी असतात किंवा घडत असतात. त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो आणि आपल्या आनंदात विरजण घालत असतो. म्हणजेच काय तर आपण आपल्या आनंदापासून दर जात असतो.

एक सामान्य व्यक्ती असतो तो सकाळी लवकर उठून ऑफिस मध्ये जातो; आणि ऑफिस मधून उशिरा घरी येतो. बऱ्याच वेळेस असे सुद्धा होते कि ऑफिस मधले काम वेळेत पूर्ण होत नाही म्हणून बऱ्याच वेळेस त्याला इतरणाचे बोलणे ऐकून घ्यावे लागते. आणि अशा वेळी तो इतरांचा राग आपल्या घरातील व्यकीनवर काढत असतो. त्यामुळे घरात सतत वादविवाद होत असतात.

अशा मुळे तो नेहमी टेन्शन मध्ये रहातो. इतर व्यक्तीसोबत बोलणे कमी करतो. आपल्या मित्रांसोबत संवाद कमी करतो. जास्त करून तो एकटा रहाण्याचा पर्यन्त करत असतो. एक दिवस असा येतो कि त्याचा मुलगा त्याच्याकडे येतो आणि त्याला काही काम साठी मदत मागतो. त्याच वेळी तो नेहमी प्रमाणे तो मुलावर ओरोडतो.

पण काही वेळा नंतर त्याला जाणवते कि आपण आपल्या मुलावर ओरडायला नको होते. आपली चूक झली असे त्याला वाटते त्याच वेळेस मुलाकडे जातो काय काम आहे हे विचरण्यासाठी मुलाच्या रूम मध्ये जातो. त्याठिकाणी एक वही ठेवलेली असते त्यावर त्याने एक निबंध लिहिलेला असतो. ज्या गोष्टी तुम्हला सुरवातीला आवडत नसतात पण कालांतराने त्या हळू हळू आवडायला लागतात.

हे वाचल्यानंतर त्याला अजून आपल्या मुलाने काय लिहिले आहे.याबद्दल त्याला वाचायचे असते. हे देवा मी आभार मानतो त्या शाळेचा जी सुरवातीला आवडत नसते. पण शाळे मुळेच आमच्या ज्ञात वाढ होत आहे. देवा मी आभार मानतो त्या औषधांचा जरी त्या बेचव आणि कडू असतात तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांच्या मुळेच आमचे आरोग्य चांगले रहाते. माझ्या वडिलांचे आभार मानतो. जरी ते माझ्यावर रागवत असतले तरी ते मला बाहेर फियाला घेऊन जातात, मझ्यासाठी चॉकलेट घेऊन येतात. त्यामुळे मी तुझा आभारी आहे तू इतके चांगले वडील दिले. कारण माझ्या मित्राचे वडील सुद्धा नाहीत.

हि ओळ वाचल्यानंतर त्याला खुप वाईट वाटते. आणि तो उरलेला निबंध स्वतः लिहितो. हे देवा मी तुझे आभार मानतो माझ्याकडे सुंदर घर आहे. कारण बऱ्याच लोकांकडे घसुद्धा नाही. हे देवा मी तुझे आभार मानतो तू मला सुंदर कुटूंब दिलेस. हे देवा मी तुझे आभार मानतो तू मला हे जीवन दिले. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास असे दिसून येते कि आपल्या जे काही मिळाले आहे त्यात आनंदी रहात आले पाहिजे. आणि जे आपल्या जवळ नाही ते कसे मिळवता येईल या कडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. प्रत्येक गोष्टीला आनंदाने कसे सामोरे जाता येईल याकडे लक्ष द्यावे.