चाकवत भाजीचे फायदे
आरोग्य

पौष्टिक चाकवत भाजीचे फायदे आणि नुकसान ..

चाकवत या भाजी खुप पौष्टिक असते. चाकवत भाजी मध्ये व्हिट्यामिन्स हे भरपूर प्रमाणात असतात. चाकवत हि भाजी ची चवीने खूप छान लागते. चाकवत हि भाजी आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद असते. आपण आपल्या आरोग्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्या ह्या नेहमी खाल्या पाहिजे. चाकवत हि भाजी आपल्याला थंडीमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. चाकवत भाजीमध्ये व्हिट्यामिन अ ,लोह,आयर्न , फॉस्फरस , फॉलीक ऍसि, पोट्याशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिलते. तसेच चाकवत भाजीमध्ये आपल्याला फायबर हि मिळते. म्हणूनच आपण चाकवत हि भाजी नियमितपणे खायला पाहिजे. मित्रानो आता आपण चाकवत भाजीचे फायदे जाणून घेऊयात.

चाकवत भाजीचे फायदे;:-

१)पोटाच्या समस्यांवर उपयुक्त:-चाकवत या भाजीमध्ये फायबर चे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे आपण हि भाजी नियमित खाल्याने आपले पॉट साफ होण्यास मदत होते. चाकवत भाजी खाल्याने पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पोटातील जंतू कमी होण्यास मदत होते. चाकवत भाजीचे आपण सूप देखील करू शकतो आणि सूप प्यायल्याने आपले पॉट साफ होण्यास मदत होते. पोटातील सर्व समसेवर हि चाकवत भाजी गुणकारी ठरते.

२)हिमोग्लोबिन वाढवते:-चाकवत ह्या भाजीत लोहाचे प्रमाण हे जास्त असल्याने आपल्या शरीरातले हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच अशक्तपणा , चक्कर येणे ह्या समस्या देखील दूर होतात. तसेच चाकवत भाजी खाल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. चाकवत हि भाजी नियमित खाल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात.

३)तोंडाला चव येते:-चक्रवात हि भाजी आजारी माणसाच्या तोंडाला चव आणते. चाकवत हि भाजी तुम्ही भाकरी किंवा पोळी सोबत तुम्हाला खाता येते. चाकवत भाजी हि चवदार लागते. जर तुम्हाला ताप, सर्दी झाली असेल तर तोंडाची चव जाते तेव्हा हि भाजी खाली तर तोंडाची चव येण्यास मदत होते. .

४)कावीळ वर उपयुक्त ;-ज्यांना कावीळ झाली आहे अश्या लोकांना चाकवत हि भाजी फायद्याची ठरते. चाकवत हि भाजी खाल्यानी थकवा दूर होण्यास मदत होते. तुम्हाला जर जळजळ होत असेल तर तर मसाल्याची भाजी न खाता हि चाकवत ची भाजी खाणे चांगले आहे.

५) ज्याव्यक्तीना वारंवार तोंड येत असेल तसेच हिरड्या मधून रक्त येत असेल तर चाकवतची पाने कच्चे चावून खाणे. यामुळे या दोनी त्रास पासून मुक्ता मिळते.

६) केसांच्या आरोग्य साठी उपयुक्त आहे, चाकवतची पाने. या मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात तसेच केसांसाठी लागणारे प्रोटीन सुद्धा या मध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.