गुणकारी शेवग्याचे शेंगा खाण्याचे फायदे , Benefits of eating Drumsticks
आरोग्य

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे. आरोग्यदायी शेवग्याच्या शेंगा.

अनेक भाज्यांमध्ये अनेक चांगले गुणकारी फायदे असतात. आज आपण शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे ( benefits of eating drumsticks) काय आहे हे जाणून घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगा पासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. बऱ्याच ठिकाणी शेवग्याचे शेंगाची भाजी खुप प्रशिध्द आहे. तर काही ठिकाणी आमटी / वर्ण मध्ये टाकून खाल्या जातात. तर काही ठिकाणी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात उकडून तिखट टाकून खाल्या जातात. जास्त प्रमाणत सांबार मध्ये वापर केलेला अनेकांनी पहिले असेल.

शेवग्याच्या शेंगा खाण्याच्या अनेक पद्धती असल्या तरी त्याची पोष्टीकता कधीच कमी होत नसते. आपल्या आरोग्यसाठी शेवग्याच्या शेंगा इतक्या गुणकारी आहेत, कि तुम्हला वाचून आश्यर्य वाटेल. काही वेळेस असे अनेक पदार्थ असतात ज्यांचे अनेक फायदे अनेक असतात. पण आपण त्यांच्या कडे लक्ष देत नाहीत. किंबहुना आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नसते. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे कोणते कोणते आहे जाणून घेऊ.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे ( benefits of eating drumsticks)

अनेक आजारपूसन आपले रक्षण करण्यसाठी लागणारे अनेक पौष्टीक आहार यामध्ये असतात. त्याच सोबत अनेक प्रथिने, जीवनसत्व ए (vitamin A ), जीवनसत्व बी १ (vitamin B 1 ), जीवनसत्व बी६ (vitamin B6 ), जीवनसत्व सी (vitamin C ), पोट्याशियम , लोह , सोडियम , फायबर, झिंक, कार्बोहायड्रेड, कॅल्शियम इतके सारे महत्वाचे शरीरासाठी लागणारे पोषक घटक त्यात असतात.

डोळ्या साठी लागणारे जीवनसत्व ए (vitamin A ) असल्यामुळे डोण्याची दुष्टी चांगली रहाते त्याच सोबत इतर समस्या सुद्धा दूर होतात. तसेच शेवग्याच्या शेंगा आहारात त्याचा समावेश केल्यास पचन क्रिया चांगली रहाते. आणि बुद्धकोष्ठ सारख्या समस्या सुद्धा कमी होत जाते.

शरीरातील कोलेस्टोलचे प्रमाण कमी करण्यसाठी शेवग्याच्या शेंगाचे सेवन अवश्य करा. शेवग्याच्या शेंगा मध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर घटक असल्यामूळे शरीरातील कोलेस्टोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. जर का शरीरातील कोलेस्टोलचे प्रमाण कमी झल्यास ह्रदयाचे स्वरक्षण होते.म्हजेच काय तर हर्ट साठी सुद्धा शेवग्याच्या शेंगा खाणे चांगले आहे.

शेवग्याच्या शेंगाचे नियमित सेवन केल्यास किडनी स्टोन सारखा त्रास कमी करण्यास मदत होते.

झिंकचे प्रमाण शेवग्याच्या शेंगा मध्ये चांगल्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण चागले रहाते. म्हणजेच डायबेटीस असणाऱ्या लोकांनी याचे सेवन अवश्य करावे. तसेच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगाचा वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.

हे पण वाचा :- खरच वजन वाढते का भात खाल्याने? भात खाण्याचे फायदे काय आहेत.

शेवग्याच्या शेंगाचे नियमित सेवन केल्यास कँल्शियम चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला मिळते त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच पचन प्रक्रिया चांगली बनते त्यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात रहाते. शरीरातील रोज प्रतिकार शक्ती चांगली बनते त्यामुळे आपल्याला इतर संसर्गा पासून वचण्यासाठी शक्ती मिळते.

शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास थकवा दूर होतोच शिवाय ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात सुद्धा राहते. तसेच पोटात जंत झाले आहे, असे वाटत असेल तर शेवग्याच्या शेंगाचा सूप तयार करून त्याचे सेवन करावे. लहान मूलनसाठी खुप उपयुक्त आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.