लाईफस्टाईल

टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय, काळवटलेला चेहरा उजळवा अगदी ५ मिनटात .

नसमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाईट वरती खूप स्वागत आहे. मित्रांनो तुमचा चेहरा जर उन्हामुळे खूप टॅन झाला असेल काळपट पडला असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात आपण टॅन घालवण्यासाठी खास व अगदी सोपा असा एक फेस पॅक बद्दल जाणून घेणार आहोत. हा फेस पॅक इतका गुणकारी व एफ्फेकिटिव्ह आहे कि तुम्हाला अगदी इन्स्टंट परिणाम दिसून येईल. कोणीतही रेमिडी आपण करून पाहतो मात्र हि जर तुम्ही नियमित केली तर त्याचा हळू हळू परिणाम दिसून येतात. पण आजच्या रेमिडीबद्दल काही उलट आहे ह्या फेस पॅक चा तुम्हाला परिणाम अगदी एका तासातच दिसून येईल.

आजच्या फेस पॅक साठी आपण बटाटा वापरत आहोत, बटाटा हा स्किन उजळण्यासाठी वापरला जातो. ह्यासोबत आणखी जे पण ह्यात घटक वापरणार आहोत ते देखील आपल्या त्वचेला उजळवण्याचे काम करतात. आता आपण जेव्हा त्वचा उजळते म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही कि आपला रंग पांढरा पडतो, पण तुमचा जो नॅचरल जो टोन आहे तो उजळून येईल. चला तर फेस पॅक बनवण्याची कृती जाणून घेऊयात.

ह्यसाठी आपल्याला लागणारे आहे ते म्हणजे २ चमचे बटाट्याचा रस, त्यात तुम्हाला १ चमचाभर लिंबाचा रस मिसळायचा आहे. तुमची स्किन ला जर लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही लिंबू स्किप करून त्याऐवजी तुम्ही मध घेऊ शकता. आता ह्या दोन्ही घटक घेतल्यानंतर आपण त्यात एक चमचा तांदळाचे पीठ टाकायचे आहे. आणि सर्व इन्ग्रेडिअनट्स छान असे मिक्स करून घ्यावे.

तर अश्या प्रक्रारे आपला फेस पॅक रेडी आहे, आता आपण हा फेस पॅक ब्रश च्या साहाय्याने किंवा अगदी हातांनी देखील तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावरती अगदी समप्रमाणात लावायचा आहे. त्यानंतर आपन हा फेस पॅक साधारणपणे १५ ते २० मिनटे ठेवायचा आहे त्यानंतर आपला चेहरा सुकल्यानंतर हा फेस पॅक आपण स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे. व नंतर आपन आपला चेहरा कोरड्या नॅपकिन किंवा टिशू पेपर ने पुसून घ्याचा आहे. तर मित्रांनो अश्या प्रकारे आपण फेस पॅक लावायचा आहे.

मित्रांनो हा फेस पॅक आपण आठवड्यातून साधारपणे तीन वेळा लावायचा आहे. तुम्हाला ह्या फेस पॅक चा परिणाम अगदी पहिल्या दिवसापासूनच दिसून येईल, तर मित्रांनो तुम्ही देखील हे फेस पॅक लावून पहा व तुम्हाला काय अनुभव येतो ते आम्हाला नक्की कळवा, तसेच आमच्या नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या लेखाला लाइक करा तसेच हा फेस पाकबद्दल आणखी मित्रांना मैत्रिणींना शेयर करा, धन्यवाद.