घरगुती उपाय

लघवी करताना जळजळ, पोटातील जळजळ होईल शांत फक्त ह्या घरगुती उपायांनी.

नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्यात किंवा काही इतर वेळी सुद्धा आपल्याला लघवी करताना जळजळीचा त्रास हा नक्की जाणवतो ह्याचे कारण असे असते कि तुमच्या शरीरातील उष्णता हि वाढलेली असते त्यामुळे तुम्हाला लघवी करताना जळजळ जाणवते. आजच्या लेखात आपण आजीबाईच्या बटव्यातील काही उपाय आपण आज जाणून घेणार आहोत जे कि आपण घरगुती करू शकतो. चला तर जाणून घेऊयात ते उपाय.

पहिला उपाय असा आहे कि कोरफड, ह्या कोरफडीचा आपण गर खायचा आहे किंवा ह्याचा ज्यूस करून प्याचा आहे. मित्रांनो जर तुमच्या कडे पतंजलीचे ज्यूस असेल तर ते आणखी उत्तम. तेही तुम्ही वापरू शकता. किंवा घराच्या अंगणात जर कोरफडीचे झाड असेल तर त्याचा आपण गर काढून वापरु शकतो.

गर काढताना आपण काळजी घ्याची आहे, आपण गर काढताना कोरफडीच्या मागच्या बाजूची आपण हिरवी साल संपूर्ण काढून घ्याची आहे त्यानंतर. आपल्याला त्यावर गरावर पिवळ्या रंगाचा भाग दिसतो तो देखील धुवून काढायचा आहे व त्यानंतर शेवटी पाण्यासारखा जो गाभा आतमध्ये असतो त्याचा आपण वापर ज्यूस करण्यासाठी करायचा आहे.

किंवा तो तुम्ही गाभा डायरेक्ट खाऊ देखील शकता, ह्यामुळे तुमच्या पोटात होणारी जळजळ लघवी करताना होणारी जळजळ लगेच थांबेल. एक आठवडा हा उपाय आपण करून पहा तुमचा त्रास हा संपून जाईल.

दुसरा उपाय गुलकंद, हे थंड मानले जाते, आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम हे गुलकंद करत असते. हे गुलकंद आपण असेच खाऊ शकता किंवा तुम्ही त्याचे सेवन दुधात टाकून देखील करू शकता. तुमच्या आवडीनुसार आपण त्याची खाण्याची वेळ ठरवून तुम्ही हे खा.

तिसरा उपाय हा उपाय खूप प्रभावी आहे खूप लोकांना माहिती असेल काहींना नसेल देखील. हा उपाय असा आहे कि आपण रात्री झोपताना एक ग्लास पाणी घ्याचे आहे त्यात आपण गूळ टाकायचा आहे त्याचबरोबर आपण त्यात धने पावडर टाकायची आहे. गूळ नसेल तर आपण खडीसाखर वापरू शकता.

मित्रांनो हा असा ग्लास रात्रभर तसाच ठेवून द्याचा आहे व सकाळी उठल्यानंतर आपण ह्या ग्लास मधील पाणी आपण गाळून प्याचे आहे. तुमच्या पोटात होणारी आग, होणारी उष्णता, सर्व जळजळ बाहेर पडेल. तुम्हाला कधीही उष्णता होणार नाही.

तुम्ही रात्री झोपताना बडीशोपचे पाणी ठेवू शकता, बडीशोप पाण्यात टाकून त्याला रात्रभर तसेच ठेवायचे आहे त्यानंतर आपण ते सकाळी पाणी गाळून घेऊन प्याच आहे. जर तुम्हाला खूपच प्रमाणात जर लघवी करताना जळजळ चा त्रास होत असेल तर तुम्ही ह्यासाठी आपण दुपारी थंड पाण्यात पाय सोडून बसायचे आहे. शरीरातील उष्णता असते ती पडते.

चौथा उपाय आहे तो म्हणजे माठातील पाणी. मित्रांनो गार पाणी पिण्याची सवय असते अनेकांना तर हे पाणी गार आपण फ्रीझ मधील न पिता आपण माठातील प्याचे आहे ह्याचे कारण म्हणजे आपण ह्या माठात एक वाळे मिळते आपण ते पाणयात टाकायचे आहे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. उष्णता कमी करण्यासाठी हे वाळे आपण पाळ्या हंड्यात किंवा माठात नक्की टाका त्याचा फायदा तुम्हाला होईल.

मित्रांनो ह्या सर्वात महत्वाची काळजीने आपण सेवन करायचे आहे ते म्हणजे जास्तीत जास्त पाणी. आपण दिवसातून किमान ३ ते ३.५ लिटर पाण्याचे सेवन करायचे आहे, ह्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच मित्रांनो आपण उन्हातून बाहेरून आल्यानंतर लगेचच पाणी पियू नये ह्यामुळे जळजळ होणे ह्यासारखा समस्या उदभवतात.