किचन टिप्स

आंबा विकत घेताय तो आंबा गोड आहे का ? हे ओळखण्यासाठीच्या ५ टिप्स…

मित्रानो आपण सगळेच उन्हाळ्याची वाट बघत असतो. कारण आंबा हा उन्हाळ्यात येतो. आंबा हा सगळ्यांनाच आवडतो.आंबा हा न आवडणार असं कोणहि दिसणार नाही.आंबा हा फळाचा राजा आहे.उन्हाळा आला कि आपल्याला बाजारात सगळीकडे आंबा दिसायला लागतो.कारण या उन्हाळ्यात आंब्याला खूप चव असते.

बाजारात सगळीकडे भरपूर प्रमाणात आंबा दिसायला लागतात. तसेच बाजारात आंब्याचे खूप प्रकार आहेत. हापूस,देवगड लंगडा,दसरा,हिमसागर असे विविध आंब्याचे प्रकार आहेत. याशिवाय बदामी,तोतापुरी,केसर,नीलम हे देखील आंब्याचे विविध प्रकार आहेत. परंतु प्रत्येकाची आवड हि वेगळी असते.

आपण चांगला आणि रसाळ आंबा बघून आणला तर तो गोड आहे का नाही?,त्या आंब्याला चांगली चव आहे का नाही?आपल्याला आंबा खरेदी करताना कोणी फसवणार तर नाही?असे अनेक प्रश्न सगळ्यांना आंबा खरेदी करताना पडतात.तर आता मी तुम्हाला रसाळ,गोड चांगला आंबा खरेदी कारण ह्या टिप्स वापर तुम्हाला त्याचा फायदा होईल.आता आपण टिप्स जाणून घेऊयात.

१)गोड आंबा कसा ओळखायचा:- आंबा खरेदी करताना तो गोड आहे का? हे आंबा हातात घेऊन ओळखा .आंबा हातात घेतल्यावर तो जर मऊ लागला तर समजा कि तो आंबा गोड आहे.पण आंबा जर कडक असेल तर समजा कि तो आंबट असेल,अश्याप्रकारे आंबा गोड आहे का आंबट हे ओळखा .

२)वास घेऊन चेक करा:- आंबा हा गोड आहे कि ओळखण्यासाठी आंब्याचा वास घ्या ,कारण आंब्याच्या वासावर देखील कळतं कि आंबा गोड आहे का,तसेच तो आंबा चांगला पिकलेला आहे का ते समजते.आंबा जर कच्चा असेल तर त्याचा वास येत नाही ,आंबा जर पिकला तरच त्याचा त्याचा वास हा येतो. त्याचप्रमाणे केमिकल युक्त आंब्याला वास हा येतच नाही.

३)गोलाकार आंबा:- आंबा खरेदी करताना त्याचा आकार हा बघूनच आंबा खरेदी करावा.आंब्याचा आकार हा जर किंचित गोल असेल तर तो गोड असतो.आंबा जर खूप छान दिसत असेल तर तो खूप पिकलेला किंवा गोड नसतो असे म्हणले जाते.

४)खड्डे असलेला आंबा खरेदी करू नका:- आंबा खरेदी करताना ते जर खूप दबले गेले असतील तर अस आंबा खरेदी करू नका.त्या आंब्याला खूप खड्डे पडलेले असतात आणि ते खूप मऊ पडलेले असतात त्यामुळे असे आंबे खरेदी केल्यास ते खूप खराब असतात आणि त्याची चव देखील चांगली लागत नाही, त्यामुळे आंबे खरेदी करताना काळजी घ्या .

५)रेषा बघूनच आंबा खरेदी करा:- आंबा खरेदी करताना नीट बघूनच आंबा खरेदी करा ,त्या आंब्यावर रेषा असतील तर असे आंबे खरेदी करू नका त्याची चव चांगली नसती आणि तो आंबा हा गोड देखील नसतो.