आरोग्य

कॅल्शियम नियंत्रणात राहील, सांधेदुखी आणि कंबरदुखी सुद्धा कमी. कसे ते जाणून घ्या

आपल्या शरीरातील जर का कॅल्शियमची मात्र कमी झाल्यास आपल्या विविध समस्यांना समोरे जावे लागते. तसेच बऱ्याच वेळेस सांधेदुखी, कंबरदुखी सारख्या समस्या आपल्याला सतत जाणवत असतील तर एक घरगुती उपाय जर केल्यास आपल्याला या सर्व समस्या कमी होऊ शकतात. तसेच वयोमानाने सुद्धा काही समस्या आपल्याला येत असतात त्यावेळेस सुद्धा आपल्याला हा उपाय केल्यास चालतो.

सध्या आपल्या आहारामध्ये नियमितता नसते. त्याच बरोबर जास्त प्रमाणत खाण्यात येणारे जंक फूड, आपल्या रोजच्या जेवणात व्हिटॅमिन ची कमतरता, पुरेशी झोप न होणे, किंवा झोपेचे अपव्यव होणे. यामुळे आपल्या शरीराची कार्य पद्धती पूर्ण पणे बदलून जाते. आणि अशा मुळे असंख्य आजार सतत आपल्या पाठीमागे चालू असतात. अशा वेळी आपल्या कॅल्शियम चे प्रमाण जर का कमी झाले तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात.

सध्या बऱ्याच लोकांना कमी वयात सुद्धा सांधेदुखी, कंबरदुखी, मसल ताणले जाणे किंवा दुखणे यासारखे आजार दिसून येत आहे. अशा लोकांनी सुद्धा आजचा उपाय जर केला तर त्याचे परिमाण तुम्हला भविष्यात सुद्धा दिसून येत राहील. आजचा उपाय हा फक्त ज्या लोकांना त्रास होत आहे अशांनी केला पाहिजे असे नसून आपल्या; उतार वयात त्रास होऊनये म्हणून केला तरी चालतो.

आजच्या उपायात आपण कोणते कोणते घटक वापरले आहे. तसेच त्याचा उपयोग कसा करायचा आहे याबद्दल जाणून घेऊ. एक गोष्ट लक्षात असुद्या घरगुती उपायांमध्ये आपण कोणते घटक वापरतो किंवा त्याचे प्रमाण किती घ्याचे कोणत्या वेळेस घ्याचे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. घटकांचे प्रमाण कमी जास्त झाले तर त्या उपायांचा लाभ आपल्याला लवकर होत नाही.

या उपाय मध्ये पांढरे तीळ वापरयाचे आहेत. पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शिमचे प्रमाण चांगले असते शिवाय व्हिटॅमिन हे चांगल्या प्रमाणत असतात. तसेच प्रोटीन सुद्धा चांगल्या प्रकारे असतात. यामध्ये B१२ चे प्रमाण चांगल्या प्रकांरे असल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांना खुप फायदेशीर ठरणार आहेत. त्याच सोबत पचन क्रिया चंगली होते, केस गळती थंबते आणि त्वचा सुद्धा चांगली होते.

हा उपाय कधी आणि केव्हा करायचा? तर हा उपाय सकाळी करायचा आहे तो सुद्धा उपाशी पोटी. कसा करायचा तर रात्री झोपण्याधी एक ग्लास पाणी घ्याचे आहे. त्यात एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे आणि पाच बदाम टाकायचे आहे. रात्रभर भिजत ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर या तिन्ही घटक आपल्या सेवन करायचे आहे. हा उपाय आपल्या सतत सात दिवस करायचा आहे. यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिम तर चांगले होईल शिवाय तर समस्या सुद्धा कमी होतील.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.