poverty in the house due to mistakes, चुकांमुळे घरात गरीबी येण्याची कारणे
घरगुती उपाय

तुमच्या या चुकांमुळे घरात गरीबी येण्याची कारणे…

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असत कि आपल्या घरात गरिबी येऊ नये . आपण सुखी असावे तसेच आपल्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या देवीचा आशीर्वाद आणि वास सतत आपल्या घरात असावा.

घरातील प्रत्येक जण हा आपल्या घरात सुख आणि समृद्धी तसेच माता लक्ष्मीचे आगमन सतत आपल्या घरात राहावे असे वाटत असते. त्याच बरोबर अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत रहावा असे सुद्धा वाटते पण काही अशा चुका आपल्या हातून होतात त्यामुळे आपल्या नशिबाला कष्ट उरते. कितिही काम केले तरी सुद्धा आपल्या हाताला यश मिळत नाही. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत कोणत्या चुका आपल्या हातून होत असतात किंवा कोणत्या चुका आपल्या हातून होता कामा नये.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरात देवघर अवश्य करा तसेच. रोज नित्य नियमाने देवांची पूजा करा. शक्यतो देव घर हे टॉयलेटच्या भिंतीला चिटकून करू नका. तसेच शक्य असल्यास देव घर हे ईशान्य कोपऱ्यात ठेवा. तसेच या गोष्टी करू नका जसेकी औदूंबर, वड आणि पिंपळ या झाड्यांच्या खाली मला किंवा मूत्र विसर्जन करू नका.

त्याच बारोबर अशा सुद्धा गोष्टी तुम्ही टाळाव्यात जसेकी सूर्य उदय किंवा सूर्यास्त होण्याच्या वेळेस घरात झोपूनये. संघ्याकाळी दिवा आणि अगरबत्ती करतेवेळेस घरात कोणी झोपलेले नाही याची नक्की खात्री करून घ्यावी. या दोन्ही वेळा या माता लक्ष्मीच्या आगमनाच्या असतात. तसेच आपल्या कमाई पेक्षा जास्त खर्च करणे टाळावे.

बरेच लोक आपल्या घराच्या उंबरावर्ती बसून जेवण करतात तसेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस मुख्य दाराच्या उंबऱ्यावरती बसून इतरांशी वादविवाद म्हणजेच भांडत बसतात अशा घरात सुद्धा माता लक्ष्मीचे आगमन होत नाही. किंवा घरात आलेला पैसा सुद्धा जास्त काळ टिकत नाही. घरात झोपताना सुद्धा काही नियमनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपले पाय दक्षिण दिशेला करून कधीही झोपूनये.

सर्वात महत्वाचे ज्या वेळी आपण अशुद्ध असू अशा वेळी आपण देवाची पूजा करे, तसेच कोणत्याही धार्मिक कर्यात भाग घेऊन नये. अशुद्ध म्हणजे काय तर आपण अंघोळ न करता देवाला स्पर्श करणे टाळावे, मंदिरात जाणे टाळावे. जर का आपल्याला सुतक असेल तरी सुद्धा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात .

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.