आरोग्य घरगुती उपाय

शरीरातील युरिक ऍसिड वाढण्याची कारणे ,लक्षणे आणि उपाय …

युरिक ऍसिड म्हणजे आपल्या शरीरातील जी घाण आहे ती ती मूत्रमार्गाने बाहेर टाकली जाते.आपल्या शरीरात प्युरीन या पदार्थपासून युरिक ऍसिड वाढत असते.प्युरीन असलेले पदार्थाचे जास्त प्रमाणात खाल्याने युरिक ऍसिड हे नष्ट होत नाही आणि ते शरीरात मोठ्या प्रमाणात साठते.

युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे :-

आपल्या शरीरातील युरिक ऍसिड हे साठून राहते. यामुळे आपल्याला गुडघेदुखी ,संधिवात ,किडनी स्टोन ,मधुमेह आणि हृदय विकार देखील होऊ शकतो. युरिक ऍसिड वाढल्यामुळे गुडघेदुखी चे प्रमाण वाढते आणि आपल्या पायाच्या अंगठ्या जवळ युरिक ऍसिड वाढते आणि सूज येते.

युरिक ऍसिडचे प्रमाण जर शरीरात वाढलेले असले तर आपल्या गुडघे आणि पायाचा अंगठा यामध्ये युरिक ऍसिडची स्पटिक तयार होतात ,त्यावरती सूज येते आणि वेदना हातात. आपल्या शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण आपल्या रक्तात वाढलेले असते.

युरिक ऍसिड वाढल्याचे कारणे:-

युरिक ऍसिड वाढनाऱ्यानी प्युरीन असलेले पदार्थ टाळले पाहिजे.त्यामध्ये मासे,कोळंबी,नॉनव्हेज ,मटार ,कोल्ड्रिंक ,दारू,बियर आणि बेकरीचे पदार्थ या पदार्थमध्ये प्युरीन हे अधिक असते त्यामुळे हे पदार्थ आपण खाणे टाळले पाहिजे.

आपल्या शरीरात युरिक ऍसिड चे प्रमाण हे हाय प्युरीनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे याचे प्रमाण हे अधिक वाढते.

शरीरातील युरिक ऍसिड वाढल्यास उपाय :-

मित्रानो आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण जर वाढले असेल तर तुम्ही योग्य ते उपाय करणे गरजेचे असते.युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करायला पाहिजे ते आपण खालीलप्रमाणे पाहुयात.

१)पाणी भरपूर प्यावे:-

आपण दिवसभरात पाणी हे जास्त पिल्यामुळे आपल्या शरीरातील युरिक ऍसिड हे लघवी वाटे निघून जाण्यास मदत होते. तसेच पाणी भरपूर प्यायल्यामुळे आपल्याला होणारा युरिक ऍसिडचा त्रास कमी होण्यास मदत होते.आपण दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी हे पिणे गरजेचे आहे.

२)आले किंवा सुंठ :-

मित्रानो आले हे युरिक ऍसिड कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.आपल्या शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आलं हे आपल्या आहारात वापर करायचा आणि सुंठ चा वापर केला तरी चालतो. आपल्या गुडघ्याच्या सुजीवर सुंठीचा लेप जर रोज लावला तर खूप आराम मिळतो.

३)हळद :-

हळद हि तर औषधीच आहे. आपल्या शरीरावर ची सूज कमी करण्यासाठी हळदीचा लेप लावू शकतो तसेच दोन कप पाणी त्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस हे सगळं मिक्स करून थोडं गरम करून पिल्यास आपल्या शरीरातील युरिक ऍसिड कमी होण्यास मदत मिळते.

४)अक्रोड :-

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी दररोज रात्री चार अक्रोड पाण्यात भिजवुन सकाळी त्याची साल काढून खावे असे दररोज केल्यास युरिक ऍसिड लवकर कमी होण्यास मदत मिळते.

५)लसूण :-

आपल्या शरीरातील युरिक ऍसिड कमी कारण्यासाठीऊ लसूण हा खूप गुणकारी आहे. आपल्या शरीरातील रक्तातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आपण कच्चा लसूण चावून खाल्ला पाहिजे असं केल्यास युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते.

आपल्या शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी ताजी फळे ,हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या याचा आपल्या आहारात घेतले पाहिजेत.तसेच आपण भरपूर प्रमाणात पाणी हे पिणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करायचे असेल तर ते उपाय करून बघा खूप फायदा होईल.