धार्मिक

श्री कृष्ण जन्माष्टमी हि अश्या प्रकारे करा साजरी आणि जाणून घ्या पूजा विधी – मुहूर्त…

श्री कृष्ण जन्माष्टमी हि अश्या प्रकारे करा साजरी आणि जाणून घ्या पूजा विधी – मुहूर्त …
मित्रांनो श्री कृष्ण जन्माष्टमी हि भाद्रपद महिन्यातीळ कृष्ण पक्षातील अष्टमीला येते.तसेच या दिवशी कृष्ण जन्म साजरा केला जातो.परंतु या वर्षी अधिक महिना आल्यामुळे श्री कृष्ण जन्माष्टमी हि श्रावण महिन्यात आली आहे.

या वर्षी कृष्ण जन्माष्टमी चे दोन शुभ मुहूर्त आलेले आहेत. तसेच श्री कृष्ण जन्माष्टमी हि ६ तारखेला साजरी करता येईल . श्री कृष्ण जन्माष्टमी हि ६ सप्टेंबर ला बुधवारी दुपारी ३. ला सुरु होईल आणि ७ तारखेला गुरुवारी दुपारी ४. ७ ला संपेल.त्यामुळे श्री कृष्ण जन्माष्टमी हि दोन दिवस साजरी करता येणार आहे.

श्री कृष्णाचा जन्म म्हणजेच श्री विष्णूचे आठवे रूप आहे.त्यांनी या पृथ्वीवर मानवाचा जन्म हा वाईटाचा नाश करण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे ज्या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

या दिवशी कृष्णाची पूजा केली जाते.कृष्णासाठी गोपाळकाला , सुठवाडा आणि डिंकाचे लाडू ,पेढे असे खूप काही नैवेद्य बनवला जातो. तसेच दुसऱ्या दिवशी गोपालकाला असतो त्या दिवशी दही हंडी फोडली जाते आणि अश्या प्रकारे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

श्री कृष्ण जन्माष्टमी हि मध्य रात्री साजरी केली जाते.या वर्षी फक्त ४६ मिनिटाचाच मुहूर्त असणार आहे. तसेच ६ सप्टेंबर ला रात्री १२ ते १२.४६ ह्या मुहुर्तवर तुम्ही कृष्णजन्म साजरा करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०९ ला करू शकता.

जय श्री कृष्णा !जय श्री कृष्णा !जय श्री कृष्णा !