धार्मिक

चैत्रगौरी पूजा,नैवद्य,मुहूर्त,चैत्रगौरी स्थापना आणि संपूर्ण माहिती…

चैत्रगौरी हि चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा सण आहे.चैत्रगौरी म्हणजेच पार्वती हि या दिवसात माहेरी जाते असे म्हणले जाते.तसेच महाराष्ट्रात “चैत्रगौर ” या नावाने ओळखली जाते आणि राजस्थानात “गणगौर ” या नावाने ओळखली जाते.चित्रगौरीची स्थापना हि चैत्रशुद्ध तृतीयेपासून चैत्रगौर हि बसवली जाते.तसेच याला चैत्रगौर उत्सव देखील म्हणले जाते.या उत्सवाला पार्वतीचा उत्सव मानला जातो.

चैत्रगौर हि चैत्रशुद्ध तृतीयेपासून ते अक्षयतृतीयेपर्यंत चैत्रगौरीची पूजा केली जाते.तसेच चैत्र महिन्यात पार्वती हि माहेरवासासाठी तिच्या माहेरी जाते असे मानले जाते. चैत्रगौरी चे हळदीकुंकू हे मंगळवारी किंवा शुक्रवारी केले जाते. चैत्रगौरी हि पाळण्यात बसवली जाते.तसेच जर कोणाकडे चैत्रगौर नसेल तर ते अन्नपूर्णा देखील बसवतात .चैत्र महिन्यात चित्रगौरीमुळे आपल्या अंगणात चैत्रांगण हि रांगोळी काढली जाते.चैत्रांगण रांगोळीमध्ये हिंदू धर्मातील प्रतीके असतात.

चैत्रगौर बसवताना अन्नपूर्णा किंवा चित्रगौरीला अभिषेक केला जातो.गौरीला अभिषेक हा पंचामृताने केला जातो.त्यानंतर गौरी बसवली जाते.चैत्रगौर हि झोपाळ्यावर बसवली जाते किंवा अन्नपूर्णा हि फुलपात्रात तांदूळ घेऊन त्यात सुद्धा बसवली जाते. गौरीला ला फुलांचा हार आणि अलंकार घालून तर गौरीची पूजा केली जाते. चित्रगौरीचा नैवेद्य हा चैत्रगौर बसवतो त्या दिवशी खीर आणि कानवाला हा नैवेद्य बनवला जातो.

चैत्रगौरी बसवल्यावर एके दिवशी हळदीकुंकूचा समारंभ केला जातो. चैत्रगौरी समोर छान अशी आरास केली जाते.चैत्रगौरीच्या आरास समोर छान अशी चैत्रांगण रांगोळी काढली जाते.
तसेच हळदीकुंकवाला कैरी घातलेली हरभऱ्याची डाळ,कैरीची पन्हे,भिजवलेले हरभरे,बत्तासे,कलिगड़ अश्या प्रकारचे फळे हा नैवेद्य दाखवतात.तसेच महिलांना हळदीकुंकवाला बोलावले जाते.आणि हा सगळं प्रसाद त्यांना दिला जातो.तसेच भिजवलेले हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरली जाते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.धन्यवाद.