धार्मिक

हनुमान जयंतीची संपूर्ण माहिती व काही घरगुती उपाय.

जरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच कीर्तनाला सुरुवात होते. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात शनिवारच्या दिवशी, तर उर्वरित भारतात शनिवार किंवा मंगळवार ह्या दिवशी मारुतीचे वार मानण्यात येतात. ह्या वर्षी हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. ह्या दिवशी करावयाचे काही उपाय आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

जर मित्रांनो जर तुम्हाला अनिष्ट शक्‍तीचा त्रास होत असेल तर हा एक छोटासा उपाय करून पाहावा. त्रास दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला त्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवावा आणि त्यानंतर तो हनुमानाच्या देवळात फोडावा. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील अनिष्ट शक्‍ती नारळात येते. असा हा नारळ हनुमानाच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी अनिष्ट शक्‍ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते असे मानले जाते.

ह्या दिवशी हनुमानाची मंदिरात किंवा घरात पूजा कशी करावी?

वाममुखी म्हणजे डावीकडे तोंड असलेल्या मारुति किंवा दासमारुतीची पूजा सामान्य लोकांनी करावी. मारुतिपूजनाच्या पूर्वी स्वतःला अनामिकेने (करंगळी जवळील बोट) शेंदूर लावून घ्यावा. मारुतीला शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल हे सर्व ह्या दिवशी जरूर अर्पण करावे. हनुमानाला फुले वाहताना ती ५ किंवा ५ च्या पटीत म्हणजेच ५,१०,१५,२०, २५ अशी वाहावीत.

हनुमानाला केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या जास्त प्रिय असतात म्हणून त्या आपण आवर्जून लावाव्यात पूजा करत असताना. उदबत्ती नेहमी उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यात धरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी. मारुतीला नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी.

त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग देवाला तर अर्धा आपल्यासाठी ठेवावा. हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात.

हनुमान जयंतीला अनेक जन मारुतिस्तोत्राचे पठण करण्याचे फायदे घ्या जाणून.

हे तुम्हाला माहिती आहे का कि असे मानले जाते कि समर्थ रामदासस्वामींचा १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुति त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुतिस्तोत्र (भीमरूपीस्तोत्र) रचले. हे स्तोत्र पठण करणार्‍याला धनधान्य, पशूधन, संतती, संपत्ति या सार्‍याचा आणि उत्तम रूपविद्यादीकांचा लाभ होतो. या स्तोत्राच्या पठणाने भूत, पिशाच, समंध आदी वाईट शक्‍तीची बाधा; सगळे रोग, व्याधी नष्ट होतात. तसेच सारी चिंता, दु:ख दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते.

बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक असणाऱ्या मारूतीवर तुमची श्रद्धा आहे का? असेल तर आजच्या लेखाला लाइक करून कमेन्ट मध्ये “जय श्रीराम” लिहायला विसरू नका.