दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत एकाच दिवशी
धार्मिक

दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत एकाच दिवशी आपल्यामुळे या गोष्टी नक्की कराव्यात.

येणाऱ्या गुरुवारी सर्वात मोठा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या दिवशी दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्य येणाऱ्या अमवस्याला दीप अमावस्या असे म्हणतात. या दिशी या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या असल्यामुळे जर का काही ठराविक गोष्टी तुम्ही केल्यास त्याचा लाभ नक्कीच मिळेल.

या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे या दिवसाला खुप महत्व प्राप्त झाले आहे. बऱ्याच वर्षा नंतर असा योग जुळून आल्या असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्व काय आहे आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याबद्द आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आषाढ अमावस्यालाच दीप अमवस्याला सुद्धा म्हटलं जाते. त्याच सोबत या अमवस्याला चातुर्मास महिन्यातील पहिली अमावस्या असेसुद्धा बोले जाते.

श्रावण महिन्याच्या एक ते दोन दिवस आधी हि अमावस्या येत आल्यामळे या दिवशी विविध दिवे लावून देवांची पूजा केली जाते. तसेच भगवान महादेव, माता पार्वती, श्री गणेश आणि भगवान कर्तिके यांची सुद्धा पूजा केली जाते. त्याच सोबत आपल्या घरातील पूर्वजांची सुद्धा पूजा केली जाते आणि त्यांच्या नावांचा सुद्धा एक दिवा लावला जातो.

यावर्षी एक योगायोगा जुळून आलेला आहे, तो म्हणजे दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. दीप अमावस्या दिवशी आपल्या जवळच्या पवित्र नदीत जाऊन अंघोळ केल्यास त्या दिवसाचे लाभ चांगले मिळतात. यावर्षी आलेली दीप अमावस्या बुधवारी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि समाप्ती हि गुरुवारी रात्री नऊ वाजून सत्तावी मिनिटांनी होणार आहे. तर गुरुपुष्यामृत योग हा सकाळी सात वाजून चार मिनीटांनी २८ तारखेला सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता संपणार आहे.

याच मुळे याच दिवशी सोने किंवा चांदी वस्तूंची खरेदी केली जाते. बरेच व्यक्ती याच दिवशी आपल्या घरातील नवीन कार्याची सुरवात करतात. काही लोक नवीन कामाची सुरवात सुद्धा याच दिवशी केली जाते. त्याच सोबत साधना आणि उपासना करून या चागंल्या दिवशी केलेल्या कार्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात.

त्याच सोबत याच दिवशी दीप अमावस्या असल्यामुळे घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यावेत. आणि ते सर्व प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. आणि प्रार्थना करावी भविष्यात आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशमय आणि आनंदाचा दिवा सतत असुदे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.