धार्मिक

आपण देवाला काही मागतो त्यावेळी हि चूक करू नका नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, संकटाच्या काळी देवाचा धावा करणारी आणि आणि संकट टळल्यानंतर देवाला विसरणारे अनेक लोक असतात तुम्ही सुद्धा तुमच्या हृदयात थोडेसे डोकावून पहा. तुमच्यावरती देखील कधी संकट आले होते, घरावर संकटे अली होती तेव्हा तुम्ही देवाचा धावा केला होता. आणि त्यानंतर तुम्ही देवाला काहीतरी बोलला असाल नवस केला असेल कि हे संकट टळुदे, आणि देवांनी देखील तुमचे मागणे ऐकलं, तुमची प्रार्थना स्वीकारली आणि तुमच्यावरील संकट दूर केलं.

तुमच्यापैकी असे कित्येक लोक असतील कि संकट उलटून अगदी वर्ष गेलं मात्र जो नवस तुम्ही बोलला होता तो तुमच्यकडून पूर्ण करायचा राहिला आहे. अनेकजण तर असे आहेत कि काही संकट आले कि देवीदेवतांना नवस बोलतात, तुम्ही फार धार्मिक आहेत तुम्ही जे देवाला वचन देता जो नवस तुम्हाला फेडायचा असतो तो तुमच्या लक्षात राहत नाही का संकटामध्ये अडचणीच्या वेळी तुम्ही नवस बोलता. अनेकजण तर देवांना पाण्यात बुडवतात आणि मात्र नंतर आपले काम झाले कि विसरून जातात. मग ह्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला काही दिवसांनी दिसायला सुरवात होते.

कुटुंबातील व्यक्ती आजारी पडतात, उद्योग व्यवसायत हानी होते, तो व्यवस्थित चालत नाही तोटा होईला लागतो. त्यामुळे पहिली गोष्ट जर तुम्हाला नवस फेडता येत नसेल तर ते बोलणे बंद करा. तुम्हाला तुम्ही जे काही देवाला बोलला आहे ते तुमच्यात पूर्ण करण्याची क्षमता नसेल तर पहिले हे नवस बोलणे बंद करा आणि जर पाठीमागे काही नवस बोलला असाल तर ते फेडून द्या.

अनेक लोक कॉमेंट मध्ये बोलतात कि आम्ही अमुक अमुक उपाय करून पहिला परंतु त्याचा फायदा झाला नाही. ह्यामागे अनेक करणे असतात अनेक लोक आपले कुलाचार करत नाहीत, आपल्या कुटुंबात जे काही पूर्वापार चालत आलेली कुलाचार आहेत. आपल्या कुलदेवतेला आपण जे काही करावं लागते त्याला कुलाचार असे म्हणतात. तर हे कुलाचार देखील ज्या घरात होत नाहीत त्या घरात देखील असे त्रास होतात, आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. कटुंबात भांडणे होऊन अगदी कुटूंब उद्वस्त होतात.

मग ह्यावर उपाय काय तर आपली जी काही वडीलधारी मंडळी आहेत अश्या लोकांकडून कुलाचार समजून घ्या व ते पाळावेत. जर जुने माणसे तुमच्यकडे नसतील तर एखाद्या गुरु माणसांची भेट घ्या, साधुसंत त्यांची गाठ घ्या ते तुमच्या कुलाचाराची ओळख करून देतील. आपण पुढील काही लेखात प्रेत्येक देवीदेवतेचे कुलाचार ह्याबद्दल माहिती देणार आहोत तर आजच्या लेखाला आमच्या जास्तीत जास्त लोकांना शेयर नक्की करा. तसेच आमचे पुढील लेख वाचण्यासाठी आमच्या पेज देखील लाइक करा, धन्यवाद.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.