Difference Between Current and Savings Accounts
अर्थ

चालू(Current Account)आणि बचत (Savings Accounts) खात्यांमध्ये फरक, तुम्हाला माहीत आहे का?

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजकाल सर्वांचे बँकेत खाते ( सेव्हिंग अकाऊंट saving account ) असतेच ,शेतकरी, गृहिणी, शिक्षक, विधार्थी या सर्वांचेच बँकेत खाते असतात. तसेच जनधन योजनेच्या अंतर्गत सर्वानी आपले खाते ओपन केलेली आहेत. पण वारंवार बँक व्यवहारामध्ये बचत खाते व चालू खाते हा उल्लेख सारखाच येत असतो तसेच आपण ATM मधून किंवा बँकेतून पैसे काढताना किंवा भरताना त्याठिकाणी पण आपणास कोणते खाते आहे ते विचारण्यात येते. मित्रानो, चला तर आपण समजून घेऊयात …

बचत खाते (Saving Account सेव्हिंग अकाऊंट )
बचत खाते म्हणजे आपल्या महिन्या अखेरीस किंवा दिवसाकाठी भविष्यासाठी उरलेली रक्कम ज्या खात्यामध्ये जमा करतो त्या खात्याला बचत खाते म्हणतात. बचत खाते हे वैयक्तिक प्रकारचे असतात या मध्ये शासकीय कर्मचारी, कामगार,शेतकरी ,गृहिणी आपली बचत करण्यासाठी बचत खाते ओपन करू शकतात.

बचत खात्याचे नियम (Saving Account सेव्हिंग अकाऊंट )
बचत खात्यामध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचे बंधन आहे. बचत खात्यामध्ये जमा केलेल्या रक्मे वरती व्याज दिले जाते. त्या व्याजावरती ग्राहकांना कर भरावा लागतो. जेष्ठ नागरिकांना बचत केलेल्या रक्मेवरती जास्त प्रमाणात व्याज मिळते. तसेच बचत खाते लहान मुलांच्या नावाने पण बचत खाते उघडता येतात. बचत खात्यामध्ये पैसे भरणे किंवा काढणे या वरती काही प्रमाणात बंधने आहेत.

चालू खाते (current account करंट अकाउंट )
चालू खाते (Current Account ) हे व्यावसायिकांसाठी असतं. याला स्टार्टअप, पार्टनरशिप फर्म, एलएलपी,  खासगी कंपन्या, पब्लिक लिमिटेड कंपन्या सुरू करू शकतातया मध्ये वैयक्तिक खाते काढता येत नाहीत.

चालू खात्याचे नियम (current account करंट अकाउंट ) 
चालू खात्यामध्ये वैयक्तिक खाते काढता येत नसतात यामध्ये कमीतकमी रक्कम हि बचत खात्यापेक्षा करंट अकाउंट माहे जास्त रक्कम ठेवावी लागते तसेच जास्तीत जास्त रक्कम ठेवण्यामध्ये कुठली हि मर्यादा नसते. पैसे काढणे किंवा भरणे यामध्ये कुठलीही मर्यादा नसते. करंट अकाउंट मध्ये कसल्याही प्रकारचे व्याज मिळत नसते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.