या पाच गणेश मूर्ती घरी घेऊन येऊ नका.
धार्मिक

या पाच गणेश मूर्ती घरी घेऊन येऊ नका.

संपूर्ण राज्यत श्री गणेशाचे आगमन होणार आहे. प्रत्येक घरात श्रींच्या आगमनाची तयारी सुरू आहे. दरवर्षी भाद्रपद महिण्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीस श्री गणेश चतुर्थी उत्सव साजरा करतोत. यालाच आपण गणेश उत्सव असे सुद्धा म्हणतो. बऱ्याच घरात श्री गणपती बाप्पा आपल्या घरी येऊन रहातात. काही लोकांच्या घरी दीड दिवस, पाच दिवस , सात दिवस आणि दहा दिवस श्री गणपती बाप्पा येतात.

श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी आपण सर्व जण श्रींची मूर्ती घरी घेऊन येतो. पण पाच अशा काही गणपतीच्या मूर्ती आहेत. त्या घरात घेऊन येऊनये तसेच त्यांची पूजा करुनये. अशा मूर्ती घरात घेऊन आल्यास दुःख, दारिद्र, अनेक संकटे येण्याची शक्यता असते. अशा मुळे श्री गणपती बाप्पाचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाहीच.

ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती वर मुकुट नाही अशा गणपती बाप्पाची मूर्ती चुकून सुद्धा खरेदी करू नका. या मागे कारण असे आहे कि मुकुट हे गणपती बाप्पाचे मनाचे प्रतीक पाण्यात आले आहे. त्यामुळे मुकुट नसलेली मूर्ती घरी घेऊन आल्यावर त्याची पूजा केल्यास त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल कि नाही यात शंका आहे. जर का तुम्ही मुकुट नसलेली मूर्ती खरेदी केली असेल तर त्यासोबत एक मुकुट खरेदी करून घ्या आणि ते गणपतीच्या डोक्यावरती ठेऊन त्यांची पूजाकरा.

दुसरी मूर्ती आहे उभी असलेली. ज्या पद्धतीने माता लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली ठेवत नाही त्याच प्रमाणे श्री गणपतीची मूर्ती उभी असेलेली घेऊन येऊनये. कारण आपण घरात जर का पाहुणे आपल्यावर त्यांना लगेच बस म्हणतो त्यांना आपण ताटकळत ठेवत नाही. त्याच प्रमाणे श्री गणपतीला आपण दहा दिवस घरात उभे ठेवणे योग्य नाही. श्री गणपती बाप्पा आपले सर्वांचे आदराचे देवस्थान आहे. प्रत्येक शुभ कामाची सुरवात त्यांच्या पासून करतो त्यांच्या आशिर्वादा पासून करतो.

तिसरी मूर्ती आहे शिव पार्वती सोबत असणारी मूर्ती. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे दिसून येते कि भगवान महादेव आणि माता पर्वती आणि श्री गणेश यांची एकत्र असेलेली मूर्ती घरी घेऊन येतात. धर्मशास्त्रात असे संगितले गेले आहे कि महादेव आणि माता पार्वतीची पूजा एकत्रित शिवलिंगाची करावी. तसेच श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी श्री गणपतीची पूजा केली जाते त्यामुळे अशी मूर्ती शक्यतो अनु नका.

हे पण वाचा :- गणपतीची मूर्ती घरी आणताना या नियमांचे पालन अवश्य करा.

चौथी मूर्ती आहे. गरुडावरती विराजमान झालेली मूर्ती घरात घेऊन येऊ नये. कारण गरुडा मुळे आपल्या घरात बरेच संकटे येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो अशी श्री गणेशाची मूर्ती घरी घेऊन येऊ नये. पाचवी मूर्ती आहे. उंदीर नसलेली मूर्ती ज्या गणपती मूर्ती वर उंदीर नाही अशी मूर्ती कदापि घरी घेऊन येऊ नये.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.