धार्मिक

संध्याकाळच्या वेळी चुकनही करू नका हि ३ कामे, नाहीतर घरातून लक्ष्मी निघून जाईल.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशी तीन कामे जी आपण करणे टाळायचे आहे विशेषकरून संध्याकाळच्या वेळी. जर कर तुम्ही हि कामे केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरावर गरिबी व दारिद्र्य निर्माण होते.

मित्रांनो भारतीय हिंदुधर्मशास्त्रानुसार प्रेत्येक काम करण्याची एक विशेष अशी वेळ असते, आणि त्यावेळी जर हे काम केले तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतात, ते काम यशस्वी होते. त्या कामातून पैसा संपत्ती मिळते.

मात्र याउलट जर आपण हे काम चुकीच्या वेळी केले तर मात्र घरात अशांती निर्माण होते. घरातील सदस्य एकमेकांशी भांडतात त्यांच्यात वाद होतात. धनसंपत्ती राहत नाही आणि परिणामी त्या घरात माता लक्ष्मी कधीही राहत नाही.

मित्रांनो अशी कोणती तीन कामे आहेत हे आपण पाहुयात. प्रेत्येक घरातील स्त्रीने सायंकाळी, म्हणजे सूर्य मावळतीच्या वेळी माता तुळशीला दिवा लावायलाच हवा. मित्रांनो माता तुळशीला दिवा लावायचा आहे मात्र बऱ्याच ठिकाणी असे दिसून येते कि हा दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो.

हि एक अतिशय चुकीची पद्दत आहे, सूर्य मावल्यानंतर तुळशीला चुकूनही स्पर्श करू नये. तुळशीची पाने तोडणे हे धर्माला धरून नाही किंवा चुकीचे मानले आहे, म्हणून आपण तुळसीची पाने तोडू नयेत. बरेच जण तुळशीला दिवा लावताना तुळशीला पाणी देखील घालतात, हे करणे देखील चुकीचे आहे.

लक्षात ठेवा कि तुळशी हि विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. म्हणून तुळशीला सायंकाळी दिवा लावला आणि हे काही नियम जर का आपण पाळले तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि त्यामुळे भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात, आणि ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न असतील त्या ठिकाणी माता लक्ष्मी देखील वास करतातच. म्हणून तुळशीबाबतीचे नियम आपण जरूर पाळा.

बऱ्याच वेळा स्त्रिया संध्यकाळी अंगण, घर झाडतात त्याची साफसफाई करत असतात, मित्रांनो लक्षात ठेवा कि जर संध्याकाळी जर तुम्ही अंगण, दार, घर जर का झाडले तर त्यामुळे आपल्या घरातील सकरात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडते.

झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे नई ज्यावेळी माता लक्ष्मीचे आगमन जेव्हा आपल्या घरात होणार आहे त्या वेळेला म्हणजेच सायंकाळची वेळ कारण माता लक्ष्मी ह्या वेळेला साक्षात पृथ्वीतलावर येण्याची वेळ असते. ह्यावेळी माता लक्ष्मी प्रेत्येकाच्या घरातून जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि जर आपण त्यावेळी जर झाडलोट करत असू तर मात्र त्या आपल्या घरात येणार नाहीत. रागवून माता लक्ष्मी घरातून निघून जातात.

मित्रांनो जर आपल्याला झाडलोट करायची असेल तर ति आपण सायंकाळच्या वेळी करू शकता. तिसरी एक महत्वाची गोष्ट बरेच लोक एकमेकांवरती आरडाओरड करतात रागवतातभांडणे चालू असतात वाद चालू असतात. मित्रांनो सायंकाळच्या वेळी कि जी वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची आहे अश्या घरात जर हि भांडणे सतत होत असतील तर अश्या वेळी आपण वादविवाद करणे टाळावे शांतीचे वातावरण ठेवावे.

आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांवरती आपण कधीही रागवू नका. कारण घरातील स्त्रिया ह्या प्रेत्येक्ष माता लक्ष्मीचे स्वरूप असतात. आणि ज्या घरातील स्त्रिया सतत दुःखी असतात त्या घरात कधीही माता लक्ष्मी टिकत नाही.

म्हणून घरात वातावरण नेहमी हसत खेळत ठेवा, घरात प्रसन्न वातावरण ठेवा. कारण ज्या घरात वातावरण प्रसन्न आणि आनंदी असते त्या घरात माता लक्ष्मी सदैव काळ टिकून राहते. मित्रांनो आजच्या लेखातील माहिती आवडली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला शेयर करा.