लाईफस्टाईल

गुरुवार रक्षाबंधन या वेळात चुकूनही नका बांधू राखी.

राखी पौर्णिमा येत्या गुरुवारी आली आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून भावाच्या प्रगतीची आणि यशाची प्रार्थना करते. आणि भाऊ तिचे आयुष्यभर रक्षण करणार याचे वचन देतो. बहीण भावाच्या नात्याचा हा पवित्र सण सुद्धा पवित्र श्रावण महिण्याच्या पौर्णिमेला येत असते. यावर्षी नारळी पौर्णिमा हि अकरा ऑगस्ट गुरुवारी सकाळी १०. ३८ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७. ०५ मिनिटांनी होणार आहे.

नारळी पौर्णिमा हि गुरुवारी सकाळ सुरू होत असल्यामुळे आपण सर्वानी गुरुवारीच म्हणजे ११ ऑगस्टलाच रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे. भद्रा काळ सुद्धा याच दिशी सुरु होणार आहे. असे मान्यता येते कि भद्राकाळात राखीपौर्णिमा साजरी केल्यास दोघांच्या आयुष्यत काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात चुकून ही राखी भावाच्या हातावर भद्राकाळात बाधूंनये.

हिंदू धर्मस्त्रात असे संगितले गेले आहे की रावणाने भद्राकाळातच रावणाने आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली होती. म्हणूच रावणाच्या सर्वात मोठ्या साम्राज्याचा विनाश झाला होता. भद्रा ही सूर्य देवाची मुलगी आहे. तसेच शनिदेवाची भद्रा ही बहीण आहे. अशी मान्यता आहे, तिच्या जन्माच्या वेळी जे काही शुभ कार्य सुरु होते त्या शुभ करायचे परिवर्तन अशुभ कार्यात झाले. त्यामुळे भद्रा तिथी मध्ये कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यास मनाई केली गेली आहे.

यावर्षी जवळ पास चार चांगले योग्य जुळून आले आहेत. या काळात जर का तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करायचे ठरवले असेल तर उत्तम काळ असणार आहे. संपूर्ण दिवस भरात कोणत्या कोणत्या वेळेत कोणते कोणते योग येणार आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. याच काळात जर का तुम्ही राखी भावाला बांधणार असला तर चांगली गोष्ट असणार आहे.

पहिला सर्वात चांगला योग आला आहे, तो सकाळी सुर्यादय ते दुपारी ३. ३२ मिंटापर्यंत असणार आहे. याला आयुष्मान योग असे म्हणतात. त्यानतंर रवी योग हा पहाटे ५. ३१ मिनिटापासून ते सायंकाळी ६. ५४ मिनीटापयंर्त असणार आहे. तिसरा योग आहे. सौभाग्य योग हा दुपारी ३. ३२ मिनिटांनी सुरु होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११. ३४ मिनिटापर्यंत आहे. त्याचा सोबत धनिष्ठा नक्षत्र बी शोभन योग असे दोन योग सुद्धा जुळून आलेला आहे.

तर भद्रा काळ हा गुरुवारी म्हणजेच अकरा ऑगस्ट ला सायंकाळी ५. १७ मिनीटांनी ते सायंकाळी ६. १८ मिनिटापर्यंत असणार आहे. याला भद्रा पुंछ असे म्हणतात. त्यानतंर सायंकाळी ६. १८ ते रात्री ८. ०० पर्यंत भद्रा मुख असणार आहे. आणि त्याच दिवशी भद्रा काळाची समाप्ती ८. ५१ मिनिटांनी होणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायंकाळी ५. १७ मिनिटापासून ते रात्री ८. ०० पर्यंत राखीपौणिमा साजरी शक्यतो करून नये.

जवळपास तीन तास भद्रा काळ असणार आहे. जरी पण काही काळ मुळे तुम्हला राखी याच काळात बंधने गरजेचे असेल तर पदोष काळात म्हणजे सायंकाळी ६. ०० ते रात्री ७. ३१ या काळात राखी बांधली तरी चालते. बाकीचा संपूर्ण दिवस भर तिथी चांगली रहाणार आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.