लाईफस्टाईल

हट्टी मुलांसाठी या गोष्टी करा ,मुलांचा राग आणि चिडचिड कमी होईल …

मित्रानो प्रत्येक पालकांना असे वाटत असते कि आपल्या मुलांनी आपले ऐकावे आणि त्याने सुसंसकृत व्हावेत .परंतु पालकांच्या जास्त लाडामुळे त्यांची मूळ हि खूप हट्टी बनतात. त्या मुलांचा तो स्वभावच बनतो. परंतु मुलांच्या ह्या हट्टी स्वभावाला पालकच जबाबदार असतात. पालकांना असे वाटत असते कि जे आपल्याला नाही मिळाले ते आपल्या मुलांना ते आणतात आणि त्यांचे सगळे हट्ट पुरवतात.

मित्रानो मुलांचे सगळेच हट्ट हे पालक पुरवतात. तसेच त्यांना कधीच ते नाही म्हणत नाही आणि याच अति लाडामुळं त्यांची मुलं हट्टी होतात.त्या मुलांचा हट्टीपणा हा पालकांनाच कमी करावा लागतो.त्यांच्या मुलांचा हट्टीपणा हा त्यांनी वेळेवर कमी नाही केला तर त्याचा परिणाम हा त्या मुलांनाच भोगावा लागतो. यामुळे याच हट्टीपणा ह्याच भविष्यात खूप मोठे नुकसान देखील भोगावा लागत.

मित्रानो मुलं हे खूप हट्ट करत असतात तेव्हा आपण त्यांना खूप रागवतो ,ओरडतो किंवा शेवटी आपण त्यांना मारतो.आपलं म्हणतो ते मुलं ऐकत नाहीत आणि मग आपण आपल्याला पाहिजे ते करतो. त्यानंतर मुलांना त्यांचं आपण ऐकत नाही म्हणून त्यांना खूप राग येतो आणि यामुळे पूर्ण घराचे वातावरनण बिघडते.

मित्रांनो तर आपण जाणून घेऊयात कि हट्टी मुलांसाठी हे उपाय करून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

१)मागितलेली वस्तू लगेच देणे :-

मित्रानो बऱ्याचदा आपण आपले काही काम मुलांकडून करून घेताना आपण त्यांना लालूच देतो त्यांना म्हणतो कि तू हे माझे काम कर मग मी तुला हे घेऊन देतो. त्यामुळे मुलांना असे वाटते कि आपण हे केल्यावर हे मला मिळणार मग त्याची ती सवय होऊन जाते. त्याचप्रमाणे त्याच्या एखाद्या मित्राजवळ जी खेळणी असते तसेच खेळणं त्याला पाहिजे असते,तेव्हा त्याला तुम्ही समजावून सांगा कि ते तुझ्यासाठी गरजेचे आहे का ते मग तो समजेल. परंतु ती वस्तू लगेच घेऊन दिली तर त्याला त्याची सवय लागून जाते आणि त्याचप्रमाणे तो नेहमी मागत राहतो.त्यामुळे मुलांना प्रत्येक गोष्ट हि समजावणे खूप गरजेचे असते.

२)मुलांचं आणि पालकांचं एकमेकांशी बोलणे :-

मित्रानो मुलांशी पालकांनी नेहमी गप्पा माराव्यात ,तसेच त्याच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यावे .तसेच त्यांने कोणाकडची वस्तू बघून मागितली तर त्याच्या शी तुम्ही बोला आणि त्याला सांगा कि तुझ्या ज्या वस्तू किंवा खेळणी आहेत ते किती छान आहेत ते बघ कोणाचं काही बघून कधी मागायचं नाही असं सांगून तुंही तुमच्या मुलांशी जर संवाद साधला तर ते तुमचं नक्की ऐकतील आणि त्याचा हट्टीपणा ते सॊडतील.

३)हट्ट कमी करा :-

मित्रानो सगळ्यांनाच असे वाटते कि आपल्या मुलांनी जे मागाल ते आपण त्यांना देऊ कारण आपल्याला असं काही मिळालेलं नसत ,परंतु याचा परिणाम उलट होतो . त्यामुळे मुलाच्या सगळ्याच गोष्टी किंवा हट्ट हे पुरवू नका . परंतु काही त्यांचे पण लाड करायला पाहिजे जस कि काही खाण्याचा हट्ट जर केला तर ते तुम्ही पूर्ण करू शकता पण त्याला पण मर्यादा ठेवा . कारण जास्त कोणताही हट्ट हा मुलांना हट्टी बनवू शकतो .त्यामुळे तुम्ही ठरवा कि त्यांचे किती लाड पुरवायचे किती नाही ते ठरवा आणि मुलांना हत्ती होण्यापासून वाचवा. कारण मूळ जर हट्टी झाली त्याचंच भविष्यात खूप नुकसान होत.