धार्मिक

कार्तिक महिन्यात ह्या गोष्टी करा, तुम्हाला खूप लाभ मिळू शकतो..

आपल्या पंचांगाप्रमाणे कार्तिक महिना हा आठवा महिना आहे. या महिन्यात शुक्ल पक्ष आणि कार्तिक कृष्ण पक्ष असे दोन पक्ष असतात. तसेच ओक्टोम्बर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात कार्तिक महिना येतो. कार्तिक महिना हा खूप महत्वाचा मानला जात असतो. या महिन्यात आपण देवी लक्ष्मी आणि विष्णुंची पूजा केली जाते. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण कार्तिक पौर्णिमा असे म्हणतो, या पौर्णिमेला आपण देवदिवाळी असे सुद्धा म्हणतो.

कार्तिक पौर्णिमेला सगळीकडे दिवे लावले जातात., तसेच या दिवशी देवांनी त्रिपुराचा वध केला होता, त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुर पौर्णिमा असे म्हणले जाते. हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो. या दिवशी कार्तिक याचे पूजन केले जात असते.दक्षिण दिशेचे स्वामी हे कार्तिक आहेत. या दिवशी दीप दान केले जाते, तसेच उपास देखील केला जातो. या दिवशी आपण आपल्या चुकासाठी आपण क्षमा मागितली जाते.

कार्तिक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा केल्यास अधिक चांगले असते. या दिवशी लवकर उठून पवित्र नदीत आंघोळ करावी, असं नाही करता आलं तर आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिक्स करून अंघोळ करावी. या दिवशी विष्णुसहस्त्रनाम ऐकावे, तसेच भगवंताचे पूजा करावी. या दिवशी पांढरे वस्त्र दान करावं.

कार्तिक पौर्णिमा हा सण आपण पाच दिवस साजरा केला जतो. कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी आपण ह्या गोष्टी केल्यास आपल्याला लाभ होतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करावेत.

1)एकादशीपासून दररोज तुळशीला पाणी घालावे,आणि रोज पाणी घालून झाल्यावर मातीचा गंध कपाळाला लावावा. असे केल्यास आरोग्य चांगले होते , तसेच आपल्या घरातील आजारपण दूर होण्यास मदत होते आणि घरात सुख समृद्धी मिळते. असे केल्यास आपल्याला भगवान विष्णूचा आशिर्वाद मिळत असतो.

२)कार्तिक महिन्याच्या या पाच दिवसात आपण लक्षुमी स्तोत्राचे आणि विष्णुसहस्रनामाचे वाचन हे केले पाहिजे असे केल्यास श्री विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. असे केल्यास आपल्याला मन सन्मान मिळतो.

३)या पाच दिवसात आपण दीप दान केले पाहिजे असे केल्यास आपल्याला शांती आणि समाधान मिळते.

४)कार्तिक महिन्याच्या या पाच दिवसात आपण सूर्याला जल अर्पण करावे असे करावे तसेच या पाण्यात आपण सिंदूर मिसळून हे पाणी सूर्याला अर्पण करावे असे केल्यास सौभाग्य प्राप्त होते

५)कार्तिक महिन्यात आंघोळ करताना त्या पाण्यात तीळ आणि गंगेचे पाणी हे मिक्स करून आंघोळ करावी, असे केल्यास आपली कामे मार्गी लागतात.

६)कार्तिक महिन्यात रोज तुळशी समोर दिवा लावावा असे केल्यास अकाली मृत्यू होत नाही असे मानले जाते.

कार्तिक महिन्यात हे उपाय तुम्ही महिना भर सुद्धा करू शकता, परंतु ज्यांना महिनाभर हे उपाय करणे शक्य नाही त्यांनी त्यांनी या पाच दिवसात केले तरी चालतात.तसेच कार्तिक महिना हा शुभ मानला जातो.