धार्मिक

पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी घराची बरकत होण्यासाठी करा हा एक छोटा मात्र प्रभावी उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, पितृपक्षाचा आरंभ सुरु झाला आहे, पितृऋण फेडण्यासाठी आपल्याला पितरांच्या नावाने श्राद्ध करावे लागते असे मानले जाते कि ह्या पितृपक्षात आपले पित्र पृथ्वीवर येतात व आपण श्रद्धाभावाने जे आपण पिंडदान किंवा तर्पण करतो त्याचा ते स्वीकार करतात. जे श्रद्धने अर्पण केले जाते ते श्राद्ध, धार्मिक मान्यतेनुसार जे व्यक्ती आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध किंवा तर्पण करत नाहीत त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रातही पितृदोषालाही महत्वाचे मानले गेले आहे.

पितृदोषामुळे मनुष्य प्रगती करू शकत नाही, प्रेत्येक गोष्टीत त्याला अडचणी व संकटांचा सामना करावा लागतो. तेच जर पित्र आपल्याला संतुष्ट असतील, आपल्यावर त्यांची कृपा असेल, तर आपले पित्र देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्याला देखील आनंदी राहण्याचा आशीर्वाद देतात. आजच्या ह्या लेखात आपण पाहणार आहोत एक छोटासा उपाय. हा उपाय छोटा असला तरी त्याचा प्रभाव मात्र चांगला आहे.

ह्या उपायामुळे आपल्याला पितृदोष तसेच पितृऋणापासून मुक्ती मिळेल. पितरांच्या आत्म्याला शांती मिळते व पितृदोष हा आशीर्वादत बदलतो, हा उपाय केल्याने पितरांच्या आशीर्वादामुळे आपल्याला जीवनात यश व प्रगती मिळते व अडलेली सर्व कामे मार्गी लागतात.

हा उपाय तुम्हाला पितृपक्षाच्या प्रारंभापासून म्हणजेच पौर्णिमेपासून ते सर्वपित्रदर्श अमावस्या पर्यंत करायचा आहे. ह्यासाठी सकाळी स्नान झाल्यानंतर सकाळी १० ते १२ च्या दरम्यान एका तांब्यात शुद्ध पाणी घ्यावे व त्या पाण्याचा तांब्या आपण ज्या ठिकाणी घरात पाणी प्याचे आपण ठेवतो त्या ठिकाणी आपण तो ठेवावा, म्हणजेच पाण्याचा माठ असेल किंवा कळशी असेल त्या ठिकाणी आपण पाण्याचा तांब्या ठेवून द्यावा.

त्या तांब्यात आपण एक रुद्राक्ष टाकायचा आहे व एक तांदळाचा एक अखंड दाना टाकावा. त्यावर एक डिश झाकून ठेवावी दिवसभर तो तांब्या तसाच ठेवावा. संध्यकाळी त्या ठिकाणी दिवे लावणीच्या वेळी, त्या ठिकाणी आपण एक तुपाचा दिवा लावावा लक्षात ठेवा कि ह्या दिव्याची ज्योत हि दक्षिण दिशेला असावी. त्यानंतर आपण त्या पाण्याच्या तांब्यावर हाथ ठेवून आपण आपल्या पितरांकडे प्रार्थना करावी. आपल्या जीवनातील अडीअडचणी संकटे दूर व्हावी ह्यसाठी आपण प्रार्थना करावी.

तो दिवा आपण तिथेच तसाच राहून द्यावा, दुसऱ्या दिवशीय आपण अंघोळ झाल्यानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा प्रज्वलित करावा. आणि १० ते १२ च्या दरम्यान आपण तो तांब्या घेऊन आपण आपल्या जवळपासच्या महादेवांच्या मंदिरात जाऊन आपण ते पाणी अर्पण करावे. आणि रुद्राक्ष घरी आपण परत आणावा. हा उपाय आपण पितृपक्षा दरम्यान अगदी दररोज शुद्ध करू शकता किंवा अगदी तुम्हाला जमेल त्या दिवशी केला तरी चालेल.

तो रुद्राक्ष आपण आपल्या घरात ठेवावा, ह्या उपायामुळे पुढील वर्षभर आपल्या घरातील अडीअडचणी घरातून दूर होतील. घरातील सर्व वातावरण सकरात्मक होईल. घरात कितिही कठीण पितृदोष असेल तर त्या पितृदोषापासून देखील आपली मुक्तता होते. मित्रांनो आजचा लेख आवडला असेलच तर आमच्या लेखाला लाईक व शेयर नक्की करा.