गाजर खाण्याचे फायदे
आरोग्य

गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का…??

सध्या बाजारात गाजर भरपूर प्रमाणात दिसत आहेत. गाजर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. गाजर खाण्याचे फायदे भरपूर आहेत. गाजरंमध्ये व्हिट्यामिन अ हे भरपूर प्रमाणात असते. गाजर हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात.

मित्रानो गाजर दिसलं कि आपल्याला आठवतो तो ससा आणि त्याचे डोळे, ससा हा गाजर खातो म्हणून त्याचे डोळेही खूप सुंदर असतात स म्हणून आपण लहान मुलांना गाजर खायला लावतो. ससा आणि गाजर यांचं एक वेगळंच नातं आहे.

गाजर हे चवीला गोड आणि दिसायला लाल असतात.गाजराचे आपण विविध पदार्थ बनवू शकतो जस कि, गाजराचा हलवा , गाजराची कोशिंबीर, गाजराचा लोणचं , गाजराचा पराठा आणि सॅलड म्हणून पण गाजर आपण खाऊ शकतो.गाजर खाण्याचे फायदे आपण खालीलप्रमाणे बघुयात .

गाजर खाण्याचे फायदे :-

१) डोळ्याचे आरोग्य :-

गाजरामध्ये व्हिट्यामिन ए असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते. गाजर खाल्याने आपल्या डोळ्याची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. गाजर खाल्याने रातांधळेपणा कमी होण्यास मदत होते. आपल्या मुलांना चस्मा लागू नये यासाठी त्यांनी गाजर हे खायला पाहिजे. त्यामुळे रोज जेवताना गाजर हे आपल्या आहारात असले पाहिजे.

२) पचनशक्ती सुधारते :-

गाजरामध्ये फायबरचे प्रमाण हे अधिक असते.त्यामुळे आपली पानशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे जेवताना जर आपण गाजर खाल्ले तर आपले झालेले अन्न हे लवकर पचते. अन्न हे लवकर पचल्यामुळे आणि फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

३) ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते:-

गाजरामध्ये पोट्यशियम चे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे गाजर खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाब असतो त्यांना सोडियम असलेले पदार्थ खाण्यास डॉक्टर मनाई करतात आणि पोट्याशियम असलेले पदार्थ झाला सांगतात. त्यामुळे गाजर हे खाल्यास पोट्याशियम जास्त मिळते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

४) कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत:-

गाजर दररोज खाल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. गजरात कॅरेटोनॉइड हे अधिक असते, त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. गाजर दररोज खाल्याने गुददाराचा आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.

५) वजन कमी करण्यास मदत:-

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्याच्यासाठी गाजर खूप चांगले असते. गाजरामध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते. तसेच गाजरामध्ये कॅलरीज चे प्रमाण हे कमी असते. गाजर खाल्याने पोट लवकर भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही.गाजर हा वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे.

हे पण वाचा:- हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी घरगुती उपाय.

मित्रांना गाजराचे हे फायदे वाचुन तुम्हाला कसं वाटलं ते लाईक आणि कंमेन्ट करून नक्की सांगा .तुम्हला जर आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेयर करा. धन्यवाद.