बऱ्याच ठिकाणी झोपण्याच्या दिशेला खुप महत्व दिले जाते. तर काही ठिकाणी झोपण्यासाठी कोणत्या दिशेला डोके आणि पाय असले पाहिजे याबद्दल सुद्धा नियम तयार केले असतात. त्यापेक्षा महत्वाची गोष्टी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण डोके झोपताना कोणत्या दिशेला करून झोपावे याबद्दल साधी माहिती सुद्धा नसते. त्यामुळे त्याना काही प्रमाणत मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
विविध शास्त्रा मध्ये कोणत्या दिसला आपले डोके झोपताना असले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. काही अशा दिशा आहेत त्या ठिकाणी आपण आपले डोके करून झोपणे हे चुकीचे मानले गेले आहे. चुकीच्या पद्धतीने झोपणे म्हणजे आपणच काही प्रमाणत आपल्या घरात समस्या निर्माण करत असतो. अति स्मृती आणि ब्रम्ह वैवर्त पुराण मध्ये कोणत्या दिसेल डोके ठेऊन झोपावे याबद्दल माहिती दिलेली आहे.
ब्रम्ह वैवर्त पुराण यामध्ये असे सांगिले गेले आहे ज्या लोकांना जप आणि धार्मिक कार्य करायचे आहे. तसेच ते जर ब्रम्हचारी किंवा साधू संत आहेत अशा व्यक्तीनी आपले डोके झोपताना पूर्व दिशेला करून झोले पाहिजे. यामुळे त्यांच्या मध्ये आत्मबल निर्माण होत असते. उपासनेसाठी लागणारी मानसिक आणि एकाग्रता त्यांच्या तयार होते.
पण त्याचा सोबत ब्रम्ह वैवर्त पुराण मध्ये असे सांगितले आहे जे लोक संसारी आहेत. अशा लोकांसाठी दक्षिण दिशेकडे डोके करून झोपायला हवे असे सांगितले आहे. त्याच उलट ब्रम्ह वैवर्त पुराण उत्तर दिशेकडे डोके करून झोपण्यास त्याचा विरोध दर्शविला आहे. या शास्त्रा नुसार उत्तर दिशेला जर का डोके करून झोपल्यास त्याना विचीत्र स्वप्ने येतात किंवा पडतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि झोप पूर्ण होत नसल्यामुळे त्या व्यक्तीची शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या लोकांच्या मध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा रहात नाही. परिणामी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्याच सोबत दोन्ही पुराणा मध्ये असे सांगितले गेले आहे कि रात्री झोपताना आपले ओले पाय घेऊन झोपूनये असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होते. आणि त्याच सोबत इतर हि समस्यांना सामोरे जावे लागते. जर का तुमच्या चिंतेत वाढ होत असेल तर समजून जा कि तुमचे डोके झोपल्यानंतर हे पश्चिम दिशेला आहे. तसेच पूर्व दिशेला डोके करून झोपल्यास विद्या कमी होते.
ब्रम्ह वैवर्त पुराण असे सुद्धा म्हटले आहे कि जो व्यक्ती सूर्य उदय आणि सूर्य मावळते समयी सतत झोपलेला असतो तो व्यक्ती नेहमी गरीब आणि दारिद्र बनत जातो. त्यामुळे शक्यतो आपण सकाळी लवकर उठावे यामुळे दोन फायदे होतात एक आपले आरोग्य चागले रहाते आणि आपल्या इतर समस्यांना सामोरे जवावे लागणार नाही.
बरेच लोक सांगितल्या प्रमाणे दक्षिण दिशेला डोके करून झोपले तरी त्याच्या कार्य पद्धिती बदल दिसून येत नाही अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी. धर्मशास्त्र यामध्ये असे सांगितले आहे. कुंडलीत चंद्र आणि शनी यांची युती झाली असेल. आणि राहू आणि केतू यांची दृष्टी चंद्रावर पडत असेल तर अशा व्यक्तीना दक्षिण दिशेला डोके करून झोपले तरी लाभ मिळत नाही.
टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.