आरोग्य

तुम्हाला जास्त घाम येतो का ,करणे आणि उपचार जाणून घ्या…

मित्रानो जास्त घाम येणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.आपल्याला उन्हाळ्यात आणि व्यायाम केल्यामुळे अधिक घाम येतो. पण काही जणांना काही केलं नाही तरी पण खूप घाम येतो. परंतु जास्त घाम येणे हे आपल्याला शरीरासाठी चांगले नसते.

मित्रानो तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तर त्याची खूप करणे आहेत. जिवाणूंच्या संसर्गामुळे,छातीत जळजळ,ताणतणाव ,टेन्शन यामुळे जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो.ज्यांना जास्त घाम येतो त्यांना हायपरहायड्रोसिस असे म्हणतात.

तसेच जर तुम्हाला व्यायामाशिवाय जर जास्त घाम येत असेल तर ती हार्ट अटॅक चे संकेत असू शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या जास्त घामासाठी घरगुती उपचार करून बघा किंवा डॉक्टरांना भेटुन घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या .

जास्त घाम येण्याची करणे:-

१)वजन जास्त असल्यामुळे सुद्धा जास्त घाम येतो.

२)तुम्ही जर प्रेगनेन्ट असलात तरी पण जास्त घाम येतो.

३)शरीरात जर जिवाणूंचा संसर्ग झाला असेल तरी पण जास्त घाम येतो.

४)तुम्हाला हायपरहायड्रोसिस असेल तरी पण घाम जास्त येतो आणि तुमच्या घामाच्या ग्रन्थि जास्त काम करतात.

५)तुम्ही तेलकट पदार्थ जास्त खाल्ले तर जास्त घाम येतो.

६)तुम्ही धूम्रपान अधिक करत असाल तर जास्त घाम येतो.

जास्त घाम येणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय :-

१)उन्हाळ्यात पाणी भरपूर प्रमाणात प्या.

२)तेलकट पदार्थ खाणे टाळा.

३)हार्मोन्स बदलामुळे आणि प्रेग्नन्सी मुले जास्त घाम येत असेल तर ड्रॉक्टरांकडे जाऊन या.

४)नियमित लिंबू पाणी प्या आणि जेवणात मीठाचा वापर कमी करा.

५)टोमॅटो चा रस आणि गीन टी चा वापर करा.

६)तसेच द्राक्षे ,स्टोबेरी आणि बदाम नियमित खा.
सुती कपडे वापरा.