तुम्ही जेवणानंतर ताटात हात धुतात का ? मग हे नक्की वाचा.
धार्मिक

तुम्ही जेवणानंतर ताटात हात धुतात का ? मग हे नक्की वाचा.

अन्न हे पूर्ण ब्रम्ह असे आपण मानतो. अन्नाचा कोणत्याही प्रकारे अपमान झाला नाही पाहिजे याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्या नकळत किंवा आपल्या शास्त्रीय माहिती नसल्यामुळे चुका होत असतात. त्यामुळे आपल्या असंख्य गोष्टींचा त्रास होत असतो. पण तो कशा मुळे होत आहे, याबद्दल आपल्याला जास्त कळत नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे योग्य पालन आपण करायला पाहिजे.

आपल्या धर्म ग्रंथातात बऱ्याच नियमांचे पालन केले पाहिजे असे सांगितले गेले आहे. तसेच जे अन्न आपण ग्रहण करतो त्याचा कधीच अपमान झाला नाही पाहजे असे सुद्धा संगितले गेले आहे. ज्या घरात अन्नाचा आदर होतो त्या घरात सतत किंबहुना नेहमी आनंद असतो. त्या घरात कधीच अन्नाची कमतरता पडत नाही. आणि ज्या घरात आनंद आहे. त्या घरात मतात लक्ष्मीचा वास सतत असतो. मतात लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरातील लोकांवर असतो.

वेगवेगळ्या शास्त्रात जेवणानंतर आणि जेवणाआधी काही नियम संगितले गेले आहे. वास्तूशास्त्रा मध्ये जेवणा नंतर काय रायला पाहिजे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे. जेवण करताना आपले मुख कोणत्या दिशेला असेल पाहिजे याबद्दल सुद्धा संगितले आहे. तसेच जेवण करताना आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याबद्दल सुद्धा सविस्तर संगितले गेले आहे. जेवण आपल्या अंगी न लागणे म्हणजे त्या वेळेस आपण काहीतरी चुका केलेल्या असतात.

अन्न ग्रहण करताना जर का आपण चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर पडत असतात. त्यामुळे आपल्या जीवनात आनंद सुद्धा येतो . जर का आपण योग्य दिशेला आपले मुख करून जेवण केल्यास त्याचे सकारत्मक परिणाम आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा पडत असतो. वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहे. जर का आपण तुटलेल्या किंवा खराब डिश मध्ये भाड्यामध्ये जेवण केल्यास त्याचे वाईट परिणाम भिष्यात दिसून येतात.

जेवण करताना आपल्या हवे आहे तेवढेच अन्न घ्या जास्तीचे अन्न घेऊन ते टाकून देऊ नका. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे त्यामुळे ताटात उष्टे अन्न सोडू नका. जर का आपण ताटात अन्न असेच सोडून दिल्यास त्याचा अपमान होतो. तसेच ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी नॉनव्हेज जेवण करू नका, त्याच दिवशी मद्यपान सुद्धा करू नका .

बऱ्याच वेळेस आपण इतर जेवण करतो किंवा कर्यक्रमा ठिकाणी पंगती मध्ये जेवण करतो अशा वेळी आपले जेवण सर्वांच्या आधी झाले असेल तर इतरणाचे होईपर्यंत त्या जागेवरून उठूनये. अन्यथा आपल्याला पितृ दोष होऊ शकतो. त्याच सोबत एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी जेवण झाल्यावर ताटामध्ये हात कधीही धुवूनये. कारण ज्या ताटामध्ये आपण अन्न ग्रहण करतो त्याच ताटात हात धुतल्यास त्या अन्नाचा अपमान होतो. ज्या घरात अन्नाचा अपमान होत असतो त्या घरात वास्तू दोष निर्माण होतात. आणि त्या घरात अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी वास करत नाही.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.