लाईफस्टाईल

डॉक्टर व त्यांचा स्टाफ हा नेहमी पांढऱ्या रंगाची कपडे घालतात ह्यामागील कारण काय.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या मराठी एन्टरटेन ह्या वेबसाइट वरती खूप स्वागत आहे. मित्रांनो डॉक्टर व त्यांचा स्टाफ हा नेहमी पांढऱ्या रंगाची कपडे घालतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का असे का पांढऱ्या रंगाचे कपडेच का ? तर मित्रांनो ह्याचा थेट संबंध येतो तो पेशन्ट आणि डॉक्टर किंवा स्टाफ च्या सुरक्षेबाबत. बीबीसी च्या रिपोर्टमध्ये असे आढळले कि पांढरा रंग हा मेडिकल प्रोफेशनचे प्रतीक मानले जाते ह्याची सुरवात १९ व्य शतकातच सुरु झाली. पण हाच रंग का.

रिपोर्ट च्या अनुसार पांढरा कोट असल्याने हा डॉक्टर व स्टाफ ला संक्रमणापासून वाचवतो. पांढरा कोटावर रक्ताचे किंवा आणखी काही केमिकल्स औषधें ह्यांचे डाग लगेच दिसून येतात व ज्यामुळे डॉक्टर ते लगेच बदलू शकतात ह्यामुळे त्याचे संक्रमण इतर पेशन्ट ला होण्यापासूनचा खतरा टाळला जातो. संक्रमणापासून तर वाचतोच त्याशिवाय हा त्यांचा एक आयडेंटिटी आहे कि पांढऱ्या रंगातील लोक म्हणजे डॉक्टर व स्टाफ आहे. ह्यामुळे पेशन्ट त्यांना आणखी जास्त सहजपणे ओळखू शकतो. व पांढरा रंग हा स्वच्छतेचे प्रतीक देखील आहे.

डॉक्टर पांढरे कोट का घालतात?

पांढऱ्या रंगाच्या कोटाबद्दल सर्व डॉक्टर लोकांचे मत काय ह्याचा एक सर्वे करण्यात आला. बीएमजे जर्नलच्या अहवालानुसार ४०० रुग्ण आणि ८६ डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना काही प्रश्न विचारण्यात आली. अहवालात असे दिसून आले आहे की, ह्यावर डॉक्टरांचा असा विश्वास आहे की पांढरा कोट घातल्याने जवळ जवळ ७० टक्के संसर्ग टाळता येतो.

जसे डॉक्टर लोकांचा सर्वे केला त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या कोटबाबत रुग्णांचे काय मत आहे यावरही संशोधन करण्यात आले. विशेषत: म्हतारे लोक वयोवृद्ध लोकांचा या संशोधनात समावेश करण्यात आला. संशोधनाचे निष्कर्ष असे सांगतात की वृद्धांना पांढरा रंग हा बुद्धिमत्तेचे व तेजाचे प्रतीक आहे असे वाटते. डॉक्टरांनी पांढरा कोट परिधान केल्याने रुग्णांना आरामदायी असा दिलासा मनाला मिळतो आणि त्यांना आत्मविश्वास देखील वाटतो असे सांगण्यात आले.

तर मित्रांनो हि होती आजच्या लेखातील काही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तसेच जर तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर लाइक व शेयर नक्की करा, धन्यवाद.