घरगुती उपाय

जेवण जेवल्यावर पोट जाड होतय का ? जेवल्यावर फक्त ह्या पदार्थाचे सेवन करा, क्षणात अराम मिळेल.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे, मित्रांनो दररोज जेवण झाल्यानंतर अनेक लोकांना पोटात जडपणा जाणवतो, ह्यामूळे अस्वस्थ होईल होते आणि त्यामुळे झोपेचा त्रास देखील होतो. आजकाल लोकांचे चालणे फिरणे कमी झाले आहे त्यामुळे लोकांमध्ये अश्या समस्या जाणवतात ऍसिडिटी होते अश्या अनेक पोटांच्या समस्या होतात. जर तुम्हालाही अश्या सर्व समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठीच आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर पोटातील जडपणा दूर करण्यासाठीचे काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुमचा हा त्रास काही मिनिटांतच बंद होईल.

आजच्या लेखात काही आम्ही असे गोष्टीबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही सेवन केल्याने तुम्हाला झटपट अराम मिळेल. सौफ, इलायची, मध, आणि अंबाडीच्या बिया. अश्या सर्वांचा वापर आपण जेवण जेवल्यानंतर खाऊ शकता चला तर जाणून घेऊयात त्यांचे गुणधर्म व काही वैशिष्ठ.

सौफ किंवा बडीशेप : तुम्ही पाहिलं असेल की साधारणपणे बडीशेप हि जेवणानंतर दिली जाते ह्यामुळे तोंडाचा वास देखील दूर होतो. हि बडीशेप फक्त माउथ फ्रेशनर म्हणून काम करत नाही तर आपल्या पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर असते हि सौफ. जेवण झाल्यानंतर बडीशेप आणि साखर खाल्ल्याने पचनास मदत होते आणि पोटाचा जडपणा दूर होतो.

भिजवलेल्या अंबाडीच्या बिया: अंबाडीच्या बिया ह्या पचनासाठी खूप उपयोगी असतात. जेवण झाल्यानंतर आपण ह्या बियांचे सेवा केल्याने आपली पोट जड होण्याची समस्यांपासून आपल्याला अराम मिळेल. अंबाडीच्या बियांचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया मजबूत होते तसेच पोटात जडपणा आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. ह्या बिया भिजवून खाल्याने तुम्हाला आणखी जास्त फायदा होतो म्हणून सकाळी भिजून ठेवलेल्या अंबाडीच्या बियांचे सेवन आपण रात्री करावे. जेणेकरून तुमच्या सर्व पोटाच्या समस्या दूर होतील.

इलायची: हिरवी वेलची सामान्यतः आपण खाण्यात सुगंध आणि चव वाढवण्यासाठी वापर केला जातो मात्र हि वेलची आपल्या पचनासाठी देखील खूप फायदेशीर असते. आपल्याला जेवल्यानंतर पोट जड होत असेल तर तुम्ही हिरव्या वेलची चा वापर ह्या समस्येसाठी करू शकता. वेलची खाल्ल्याने पचनास मदत होते आणि पोट फुगण्यापासून देखील वाचते. त्यामुळे आपण जेवण झाल्यावरसाधारण १ किंवा २ हिरवी वेलची चावून खावी.

मध: मधाचा वापर आणि त्याचे गुणधर्म ह्याचा उल्लेख अगदी खूप प्राचीन काळापासून केला गेला आहे आयुर्वेदात मध हे औषधी गुणधर्मांचा खजिना असल्याचे म्हटलेले आहे. मध जरी खाण्यास स्वादिष्ट असले तरी त्याचे फायदे देखील खूप आहेत. जेवणानंतर मधाचे सेवन केल्याने पोटातील जडपणा दूर होतो, त्याचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. मधामध्ये असलेले घटक पचनक्रिया जलद करण्यास मदत करतात तसेच ते रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करतात. जेवणानंतर १ किंवा २ चमचे मध घेतल्याने पोटाचा जडपणा दूर होतो. जर तुम्ही शुगर पेशन्ट असाल तर हे घेणे टाळावे वरील गोष्टींचा त्यांनी वापर करावा.

तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपण जेवण केल्यानंतर खाऊ शकतो ज्यामुळे आपला पोट जड होण्याची समस्या, पचनासंबंधी काही समस्या असतील तर त्या सर्व दूर होतील. तर मित्रांनो आजची माहिती आवडली असेल तर लेख नक्की शेयर करा, धन्यवाद.