धार्मिक

वटपौर्णिमाच्या दिवशी हि वस्तू करा दान आयुष्यात आर्थिक समस्या येणार नाहीत.

वाटीपॊर्णिमा हि सर्व लग्न झालेल्या महिलनासाठी खुप महत्वाचा दिवस असतो. या दिवशी सर्व महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतीला दीर्घ आयुष्या लाभावे सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी सुद्धा ते पूजा आणि उपासना करतात. याच दिवसाचा उपयोग करून आल्या आर्थिक समस्यांचा नाश करू शकतो.

आपल्या घरात आर्थिक समस्या सारख्या होत असतील, घरात कोणत्याच मार्गाने पैसा येत नसेल. आलेला पैसा घराबाहेर जात असेल, तसेच उद्याग व्यवसायात सतत अडचणी येत असतील वाटपोर्णीमाच्या दिवशी काही विशेष कार्य केल्यास त्याचे लाभ चांगले मिळतात. या दिवशी आपल्या रोज वापरण्यात येणाऱ्या झाडूचा उपाय करायचा आहे.

बऱ्याच लोकांना माहित नसेल. माता शीतला देवी च्या हातात झाडू आहे. माता शीतला देवी सर्व रोगांचा नाश करते. आणि झाडू घरातील वाईट गोष्टी पूर्ण पणे सपंवुन टाकतो. झाडूचा उपाय करण्याआधी काही झाडूचे नियम आपल्या जाणून घ्याचे आहेत. यामुळे सुद्धा आपल्या घरातील बऱ्याच वाईट गोष्टी नष्ट होऊ शकतात. तसेच घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ रहाते.

खुप छोट्या गोष्टी असतात याचा उपयोग आपण रोजच्या जीवनात केला तर आपल्याला बऱ्याच प्रमाणत लाभ होऊ शकतो. संध्यकाळी कधीही झाडून काढूनये, ज्या वेळी आपण घरात देवासमोर दिवा अगरबत्ती लावतो त्याच्या आधी झाडून काढावे त्या नंतर नाही. कारण संध्याळच्या वेळेस माता लक्ष्मीचे आगमन होत असते. अशा वेळी झाडू मारणे योग्य नाही.

दुसरी गोष्ट आल्या घरातील प्रमुख व्यक्ती कामा साठी जर घराबाहेर गेली असेल त्या वेळेस लगेच झाडून काढू नका. यामुळे ज्या कामासाठी ती व्यक्ती घराबाहेर गेली आहे त्या कामात नक्कीच अडथळे येण्याची शक्यता असते. त्याच सोबत झाडूची घरातील जागा एकच ठेवा सारखी सारखी झाडूची जागा बदलू नका यामुळे सुद्धा घरातील लक्ष्मी बाहेर जाते.

झाडू जास्त प्रमाणात वापरला असेल तर तो लगेच बदलून टाका जास्त जीर्ण झालेला झाडू लगेच बदलून टाका तसेच नवीन झाडू शक्यतो शनिवारी आणावा आणि त्याच दिवशी त्याचा वापर करावा यामुळे सुद्धा आपल्या घरात धनाची अवक वाढते. काही जण चूक झाडू लाथ मरतात किंवा त्यावर पाय ठेवतात. हि गोष्ट चुकीची आहे. कारण आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानतो. त्यामुळे चुकून सुद्धा या गोष्टी करू नका.

वटपौर्णिमा च्या दिवशी आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे. वटपौर्णिमाच्या दिवशी आपल्या तीन झाडू खरेदी करायचे आहेत. ब्राह्ममुहूर्तावरती हे तीन झाडू मंदिरात जाऊन आपल्याला दान करायचे आहेत. मंदिरात तुम्ही हे तीन झाडू दान करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या, कारण हे गुप्त करायचे आहे. तसेच हे मंदिर गुप्त दान केल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होण्यास सुरुवात होऊ शकते.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.