वास्तुशास्त्रा

घरात ह्या वस्तू अजिबात सांडू देऊ नका नाहीतर येऊ शकते संकट.

मित्रांनो स्वयंपाकघरात एखादी गोष्ट सांडणे हि खूप सामान्य घटना आहे मात्र स्वयंपाक घरातील अश्या तीन वस्तू आहेत ज्या वारंवार सांडत असतील तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे, कोणत्या आहेत त्या तीन वस्तू त्या जाणून घेऊयात. बालपणी आपल्या हातून जेव्हा मीठ सांडायचे तेव्हा आई आज्जी आपल्याला म्हणायच्या कि मिठाचा एक ना एक दाना उचल नाहीतर नर्कात जावे लागेल, पापण्यांनी मीठ भरावे लागेल. वास्तविक पाहता, मिठाचे महत्व कळावे ते पुन्हा हातून सांडू नये ह्या साठी तो धाक दाखवला जात असे.

मिठाशिवाय आपले जीवन अगदी अळणी आहे. मीठ समुद्रातून मिळत असल्याने ते सागरपुत्र व लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो. त्याचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार जर आपल्या हातून जर का मीठ सांडले तर आपल्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्र कमकुवत होतात आणि वैवाहिक जीवनात देखील अडथळे येतात वाद निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हातून जर सारखे तेल सांडत असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे, तेल हे मारुती व शनीला प्रिय आहे. तेल वारंवार सांडणे म्हणजे माता लक्ष्मीची अवकृपा होणे आहे, घरावर संकट ओढवणार आहे.

तसेच वारंवार तेल सांडल्याने व्यक्ती कर्जबाजारी देखील होतात. तसेच पूजेचे ताठ पडणे हे देखील गोष्ट अशुभ मानली जाते, ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते कि पुजेबाबत देवबाबत किंवा आणखी काही तुमच्या मनात पूजा करताना किल्मिष असेल तर अश्या वेळी पूजेची थाळी आपल्या हातून पडते किंवा दिवा समयी विजतो. म्हणूनच ह्या सर्वांची नीट काळजी घ्यावी.

गृहप्रवेश करताना घरात दूध ओतू घालवले जाते, ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने वास्तूत सुबत्ता नांदावी, सुखसमाधान नांदवे असे त्यामागील हेतू असतो मात्र दूध जर आपल्या घरात सारखे सारखे ओतू जात असेल तर अशुभ लक्षण आहे, दुधाच्या नासाडीमुळे कुंडलीतील चंद्राचे स्थान कमकुवत होते. ह्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो. आपल्यावर आर्थिक संकटे येऊ शकतात त्याचबरोबर सुख समृद्धीवर देखील ह्याच परिणाम होतो.

नववधू घरात प्रवेश करताना तिच्या पाउलांनी, घरात सुख समृद्धी व धनधान्य भरून वाहावे म्हणून धान्याचे माप उंबरठ्यात ठेवतात व ते सांडून लक्ष्मी घरात येते. मात्र अनावधानाने जर घरात जर गहू तांदूळ घरात सांडत असतील, किंवा कीड लागून फेकावे लागत असतील तर ते अन्नपूर्णा मातेचा अवमान असतो, त्यांची जर अवकृपा जर आपल्याला टाळायची असेल किंवा वैभव, लक्ष्मी जर रुष्ट होऊ नये असे वाटत असेल तर आपण धान्य घरात सांडणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.