धार्मिक

१४ जून मंगळावर वटपौर्णिमा, चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी ह्या सात चुका करू नका.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. सावित्रीने ज्या दिवशी सत्यवानाचे प्राण मिळवले तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा दरवर्षी आपण पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिन साजरा करतो ह्या वर्षी वटपौर्णिमेच्या १४ जून २०२२ रोजी मंगळवारी आहे. ह्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यसाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा ह्याउद्देशाने, वडाच्या झाडाची पूजा करतात. परमेश्वराकडे मागणे मागतात. मात्र त्याचवेळी सात कर्म हिंदू धर्म शास्त्राने ह्या दिवशी करण्यास सक्त मनाई केलेली आहेत. हि सात कर्म जी सुवासनी स्त्री करते, तिला वटपौर्णिमेच्या पूजेचे फळ कधीही मिळत नाही. हि सात कर्मे कोणती आहेत ह्याबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी स्त्रियांनी काळ्या किंवा सफेदरंगाच्या बांगड्या तसेच साड्या किंवा वस्त्र आपण घालू नयेत. सफेद रंग हा वैधव्याचे प्रतीक आहे तर काळा रंग हा अति अशुभ मानण्यात आलेला आहे. म्हणून आजचा दिवस हा आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण जे व्रत करत आहोत त्या दिवशी आपण हि चूक करू नका. वटपौर्णिमेची पूजा, विशेषकरून शहरात अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात व त्या फांदीची पूजा केली जाते. खर तर हिंदू धर्म शास्त्र असे मानते कि सर्व हे व्रत वैकल्य हे निसर्गाच्या नियमानुसार आपण साजरे करायला हवे. जेव्हा आपण वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करतो तेव्हा ती निसर्गनियमांच्या विरुद्ध असते.

वृक्ष सुद्धा सजीव आहेत असे जगदीशचंद्र बोस ह्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत, ह्याउलट आपण फांदी तोडण्याऐवजी एखाद्या फांदीचे रोपटे विकत घ्यावे ते आपल्या घरी आणावे व त्याची पूजा करावी आणि त्या वृक्षाचे संवर्धन करावे. ह्यामुळे आपल्या देवीदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. वडाच्या झाडामध्ये तर साक्षात शिवशंभो वास करतात आणि त्यांची कृपा प्राप्त करण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग आहे.

ह्या दिवशी आपण आपल्या घरात चुकूनही मांसाहार करू नये, शक्यतो सात्विक आहाराचे पोषण करावे. ह्यादिवशी घरातील पुरुषांनी कोणत्याही महिलेचा अपमान होणार नाही कोणत्याही महिलेचे मन दुखावले जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. शरीरासोबत आपल्या मनाची देखील शुद्धी फार महत्वाची असते, म्हणून ह्या दिवशी स्त्रियांनी अगदी कोणाविषयी देखील वाईट विचार किंवा चेष्ठा मस्करी करणे टाळावे तरच त्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते.

आपल्या भागात जी पद्दत आहे त्याप्रमाणे त्या वडाची पूजा करून आल्यावर त्या उपवास सोडतात. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या ती म्हणजे जी जेष्ठ पौर्णिमा आहे हि आदल्या दिवशी म्हणजेच १३ जून रात्री ९:१३ मिनीटांनी प्रारंभ होत आहे आणि तिची समाप्ती सायंकाळी ५:२२ ला होत आहे. म्हणून वटपौर्णिम साजरी करताना ती मुहूर्ताच्या वेळातच करावी. तर ह्या काही गोष्टींचे पालन आपण केले तर आपली पूजा सफल होईल, आणि त्या व्रताचे संपूर्ण फळ देखील आपल्याला मिळेल.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.