नमस्कार मित्रांनो तुमचे आजच्या लेखात खूप स्वागत आहे. मित्रांनो फळे खाणे हे आरोग्यसाठी चांगलेच असते आणि त्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. फळे खाल्ल्याने आपले शरीर व आरोग्य चांगले राहते असे म्हणतात. ह्या फळांमध्ये केळीही येतातच. पण केळीचे जर जास्त प्रमाणात खाल्ली तर ते देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आहारात केळीचा समावेश असतोच. केळीच्या सेवनाने पाचनशक्ती सुधारते असे म्हटले जाते, परंतु कच्ची केळी जर आपण खाल्ली तर आपल्याला त्याचे उलटे परिणाम देखील पाहायला मिळतात, आपल्याला पोटदुखी देखील होऊ शकते.
आपला लठ्ठपणा वाढू शकतो
आपण जर जास्त केळी खाल्ली तर आपला लठ्ठपणा वाढू शकतो. केळीमध्ये फायबरसोबतच त्यात साखरदेखील असते. केळी हि जर आपण दुधासोबत जर घेतली तर आपले वजन वाढू शकते.
तुमची शुगर वाढू शकते
ज्यांना मधुमेह किंवा प्रो-डायबेटिक लोकआहेत त्यांच्याकरिता जास्त केळी खाणे हानिकारक ठरू शकते. केळीमध्ये नैसर्गिकरीत्याच साखर असते आणि जर तुम्ही त्याचे सेवन जास्त प्रमाणात केले तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. ह्याबरोबरच तुम्हाला डोकेदुखी आणि झोप न येणे अश्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच आपण केळीचे सेवन हे जास्त प्रमाणात करू नये.
या लोकांनी केळी खाणे शक्यतो टाळावेच
तुम्हाला माहिती नसेल पण जर जास्त केळी खाल्ली तर आपले दात किडतात तसेच ह्या केळीत साखर आणि स्टार्च राहते त्याचबरोबर ह्यात एमिनो ऍसिड टायरोसिन हे देखील असते, ह्या घटकांमुळे हे शरीरातील टायरामाइनमध्ये रूपांतरित होते आणि टायरामाइन मायग्रेनला चालना देतात. त्यामुळे मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ह्याचे सेवन जास्त करू नये तसेच ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी देखील केळीचे सेवन कमी करावे किंवा शक्यतो टाळावेच.
जे दररोज व्यायाम करतात जिम ला जातात त्या लोकांनी दिवसातून ४ ते ५ केळी खाल्ली तर चालतात मात्र बाकीचे लोक ज्यांची जास्त हालचाल नसते त्यांनी मात्र १ ते २ दिवसात खावीत जास्त खाऊ नयेत. तर मित्रांनो आजच्या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा तसेच हि माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रणीनां देखील शेयर करा, धन्यवाद.