आरोग्य

पेरू खाल्ल्याने हे ३ आजार दूर होऊ शकतात.

पेरू हे बाजारात सहज मिळते.पेरू हे एक गोड असे फळ आहे. पेरूचा रंग हा हलका हिरवा असा असतो. पेरू हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. पेरू मध्ये व्हिट्यामिन सी असते.पेरू खाल्यानी आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

मित्रानो तर आता आपण पेरू खाण्याचे फायदे-

पेरूमध्ये कॅल्शियम ,फायबर , व्हिट्यामिन अ हे गुणधर्म आहेत. तसेच पेरूमध्ये लोह हे भरपूर प्रमाणात असतात. ज्यांना लोहा ची कमतरता आहे त्यांनी पेरू हे अवश्य खाल्ले पाहिजे, त्यामुळे लोहाची असलेली कमी दूर होण्यास मदत मिळते.

पेरू खाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.पेरूमध्ये फायबर चे प्रमाण अधिक असल्यामुळे पोट देखील साफ होण्यास मदत मिळते. तसेच पेरू हा काळं मीठ लावून अनोशपोटी खाल्याने अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

पेरू हा खूप गुणकारी आहे, ज्यांना अर्धशिशी चा त्रास आहे , त्यांनी कच्चा पेरू घेऊन त्याची पेष्ट करून ती डोक्याला लावावी असं केल्यास अर्धशिशी चा त्रास कमी होण्यास मदत होईल.

मित्रानो पेरू प्रमाणेच त्याची पाने हि खूप गुणकारी असतात. पेरूची पानाची पेष्ट करून ती डोळ्याखाली लावलीत तर तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होईल. तसेच जर तुमचे दात दुखत असतील तर पेरूची कोवळी पाणी चागली तर दात दुखी कमी होण्यास मदत होईल. तसेच तुमच्या तोंडातील दुर्गंध सुद्धा कमी होण्यास मदत होईल.

तुम्ही जर आजारी असाल आणि तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही पेरूची पाने चांगला तोंडाला चव येईल, तसेच पेरूच्या पानाचा रस हा जुलाबावर गुणकारी असतो.

पेरू हा आरोग्यवर्धक असतो. पेरू खाल्याने आपला चेहरा हा अधिक चमकदार आणि सुंदर दिसायला लागतो. तसेच पेरू हा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो.

मधुमेह असणाऱ्या लोकांनी पेरू हा नियमित खाल्यास त्याची शुगर हि कॅन्ट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते. पेरू हा साखरीची पातळी कमी करण्याचे काम करते.

मित्रानो पेरूमध्ये आयोडीन चे प्रमाण हे जास्त असते , त्यामुळे ज्यांना थायरॉइडची समस्या आहे त्यांनी रोज योग्य प्रमाणात पेरूचे सेवन केले पाहिजे,त्यामुळे थारॉईडची समस्या कमी होण्यास मदत होईल.मित्रानो तुम्हाला आम्ही दिलेली पेरू बद्दलची माहिती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कंमेन्ट करून नक्की सांगा ,धन्यवाद .