आरोग्य

शिळे अन्न खाल तर वाढू शकते कोलेस्ट्रॉल …

सध्या महागाई इतकी वाढली आहे कि शिळे अन्न फेकून न देता महिला त्या हे अन्न खातात.महिलांनी दररोज किती हि मोजून स्वयंपाक बनवला तरी तो शिल्लक राहतोच आणि शिळं अन्न फेकून नको द्यायला म्हणून ते खाल्लं जात.महिलांना स्वयंपाक बनवताना असं वाटतं असतं कि बनवलेला स्वयंपाक हा सगळ्यांना पुरला पाहिजे ,पण कुटुंबातील सदस्य कमी भूक असल्यास कमी अन्न खातात आणि ते उरते.

आहारतज्ञ असे सांगतात कि,सारखं-सारखं शिळे अन्न खाल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत असते.महिलांना त्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास त्यांनी शिळे अन्न खाल्ले नाही पाहिजे.शिळ्या अन्नात जिवाणूं हे अधिक असतात. त्यामुळे आपली पचनशक्ती बिघडते आणि पचनशक्ती बिघडली तर अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते.महिलांना असे वाटत असते कि, अनेकांना जेवण मिळत नाही आणि आपण अन्न फेकून कस द्यायचं त्यामुळे त्या शिळं अन्न फेकून न देता ते खाऊन टाकतात.

मित्रांनो दररोज ताजे अन्न खाणे अधिक चांगले असते.आपण दररोज ताजे म्हणजेच सकाळी,दुपारी तसेच रात्री अन्न हे ताजे आणि त्या त्या वेळेला शिजवून खाल्ले पाहिजे.दररोज च्या जेवणात हिरव्या पालेभाज्या ,सगळ्या प्रकारच्या कोशिंबीरी ,एक ग्लास ताक आणि दिवसात एक तर फळ खाणं चांगलं असत,अश्या प्रकारे आपला रोजचा आहार असेल तर तुम्ही निरोगी राहू शकता.

मित्रानो तसेच रोजच्या आहारात गाजर,बीट,खजूर,काळ्या मनुका, शेंगदाण्याचा लाडू,याचा समावेश असेल तर तुमचे हिमोग्लोबिन देखील चांगले राहते.महिला ह्या घराचा महत्वाचा भाग असतात त्यामुळे त्यांनी त्याच्या आरोग्याची काळजी हि विशेष घेतली पाहिजे. महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे.

शिळे अन्न खाल्याने आपल्या शरीराला कोणकोणते नुकसान होते हे आपण जाणून घेऊयात.

१)शिळे अन्न खाल्याने आपल्या शरीरात फॅट चे प्रमाण वाढते.शरीरात फॅट चे प्रमाण वाढल्यामुळे आपले वजन देखील वाढते आणि अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते.

२)शिळे अन्न खाल्ल्याने अनेकांना फूड पॉइझन देखील होते. शिळे अन्न हे जर पचले नाही तर ते आपल्या शरीरात सोडून आपल्याला फूड पॉइझन देखील होऊ शकते.

३)शिळे अन्न जर आपल्याला व्यवस्तीत पचले नाही तर जुलाब-उलट्या देखील होऊ शकतात त्यामुळे शिळे अन्न खाणे टाळले पाहिजे.

४)शिळे अन्न खाल्यामुळे अनेकांना विषबाधा होऊ शकते. त्यामुळे शिळे अन्न खाल्ले नाही पाहिजे.विषबाधा झाली तर गंभीर आजार देखील होऊ शकतो.

५)शिळे अन्न खाल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण अधिक वाढते त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

मित्रांनो शिळ्या पदार्थमध्ये काय खाऊ नये. शिळा भात,तेलकट पदार्थ, शिळा बटाटा,वांग्याची भाजी,खूप दिवसाचे दुधाचे पदार्थ ,पालकाची भाजी हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. या पदार्थमुळे आपल्या शरीराला अधिक नुकसान होते.त्यामुळे महिलांनी हे पदार्थ खाऊ नयेत यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांनी शिळे अन्न खाणे टाळले पाहिजे.आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे .थोडं अन्न कमी खाल्लं तर चालेल पण शीळ अन्न खाणं टाळलं पाहिजे