लाईफस्टाईल

जे भाव देत नाहीत ते लोक सुद्धा तुमचे तळवे चाटतील फक्त ह्या ३ गोष्टी करा.

मित्रांनो जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत तुमचे तळवे चाटू लागतील फक्त ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्की करा. त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जश्यास तसे वागा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संयम ठेवा व तिसरी व शेवटची गोष्ट म्हणजे योग्य ते प्रतिउत्तर द्या तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत का ?तुम्हाला ते नेहमी नजरअंदाज करतात का ? कारणे काहीही असूदेत.

जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी समजतात, थोडक्यात तुमचा अपमान करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. अश्या लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आजच्या लेखात आपण अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यत अमलात आणल्या तर हेच लोक तुम्हाला भाव देऊ लागतील.

सर्वात पहिली जश्यास तसे वागा, होय मित्रांनो समोरचा तुमच्याशी जसे वागतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही त्याचाशी वागा तो तुमचा कॉल उचलत नाही तुम्ही देखील त्याचा कॉल उचलू नका. मित्र जर तुमचा व्हाट्स अँप मेसेज पाहून देखील जर रिप्लाय करत नसेल तर तुम्ही देखील त्याचा मेसेज पहा तुम्ही देखील त्याला रिप्लाय अजिबात करू नका, म्हणजे काय तर तो जर तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही देखील त्याच्याकडे लक्ष देऊ नका भाव देऊ नका.

तुम्ही देखील त्याच्याकडे दुर्लक्षित करा. तुम्ही त्याच्याबरोबर असे वागल्याने तो कदाचित नक्कीच गोंधळून जाईल. तो कदाचित तुमच्यावर रागावेल सुद्धा आणि तो तुम्हाला विचारेल सुद्धा कि तू चुकीचे वागत आहे बरोबर नाही. वा रे दुनिया म्हणजे तू वागत होता ते बरोबर आणि मी तुच्या सोबत असे वागत आहे ते चुकीचे ? मित्रांनो तुम्ही पहिली पायरी यशस्वीरीत्या पार केलेली आहे.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संयम ठेवणे तुमचे हे जश्यास तसे उत्तर देणे सुरु ठेवा, हे करत असताना तुम्हाला कदाचित गिल्टी वाटेल कि तुम्ही त्याचाशी चुकीचं करत आहात. कदाचित तुम्ही एकटे पडाल थोडे दिवस एकटे राहा. चार चौघात राहून अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा काही दिवस एकट्याने राहणे कधीही श्रेयसकरच.

संयम ठेवणे गरजेचे आहे. तो तुमच्याशी कसे वागत होता ते नेहमी लक्षात ठेवा. संयम ठेवा, तुम्हाला कमी लेकणाऱ्या तुम्हाला काडीचा देखील भाव न देणाऱ्याला तुमची किंमत दाखवून देण्यासाठी आता फक्त एकच पायरी शिल्लक राहिली आहे म्हणून गिल्टी वाटून घेऊ नका.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य प्रतिउत्तर, हे तू चुकीचे वागतो आहे. जेव्हा समोरचा तुम्हाला असे म्हणेल तेव्हा तुम्ही इतकेच म्हणा कि नाही रे, तुझा हा गैरसमज आहे. तुझ्याकडे मी दुर्लक्ष करत आहे. खरतर मी आजकाल कामात खूपच बिझी आहे. बाकीच्या कामासाठी मला आजकाल अजिबात वेळच मिळत नाही.

तू जसे समजतो तसे काहीही नाही. मित्रांनो इतर सर्व गोष्टींसाठी ह्या दोन शब्दात सर्व काही आले. जो व्यक्ती इतर गोष्टींमध्ये तुमचा अपमान करत होता त्याचा समावेश ह्या २ गोष्टींमध्ये केलेला आहे. त्याच्यासाठी तुमच्या मनात आता काहीही किंमत शिल्लक नाही. हे तुम्ही त्याला ह्या एका वाक्यातून दाखवून दिले आहे.

अनेकजण ह्या शेवटच्या पायरीवर एक मोठी चूक करतात ते म्हणजे सगळेकाही खरं सांगण्याची, कि मी तुला जाणीवपूर्वक सर्व काही करत होतो तुला मी मुद्दाम टाळत होतो. तू माझ्या कडे दुर्लक्ष करत होतास आणि म्हणून मीही तुझ्याकडे दुर्लक्ष करत होतो हे तुम्ही त्याच्याकडे कधीही सांगू नका. मित्रांनो आता तर कुठे सुरवात झाली आहे, जे जे लोक तुम्हाला कमी लेखतात तुमच्याशी चुकीचे वागतात त्यांना योग्य वळणावर आणण्याची.